कृष्णा अँटीऑक्सिडंट कंपनीत कामगारांचा पगारवाढ करार संपन्न
भारतीय कामगार सेने युनियन च्या प्रयत्नांना यश
ओंकार रेळेकर-चिपळूण
शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार देणाऱ्या,खड्पोली पंचक्रोशी मधील सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेणाऱ्या चिपळूण तालुक्यातील खड्पोली औद्योगिक वसाहती मधील कृष्णा ऑक्सिडंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधील कामगारांच्या पगारवाढीवर मंगळवार दि.२९ डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले,शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मागील काही दिवस सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे,