शिवळे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

शिवळे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

 शिवळे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

सुधाकर वाघ-मुरबाड            जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाड संचलित शांतारामभाऊ घोलप कला विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे मधील राष्ट्रीय सेवा योजना व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालया मध्ये रक्तदान शिबिराचे गुरुवार 31 डिसेंबर 2020 रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीरामभाऊ पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संकल्प ब्लड बँकेचे व्यवस्थापक डॉक्टर सोनाली देसाई, डॉक्टर राणेश नायर व त्यांचे सहकारी टीम उपस्थित होते. 


महाविद्यालयातील एनएसएस विभागातील अनेक स्वयंसेवकाने रक्तदान केले. तसेच या कार्यक्रमासाठी एनएनएस कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एम. बिराजदार, प्राध्यापक भास्कर पी.बी., प्राध्यापक प्रिया भगत, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष श्री. यशवंत माळी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील उपप्राचार्य डॉ. जी.आर .विशे, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि एन.एस.एस चे स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment