तासगावातून जय वैभवलक्ष्मी आयुर्वेदीक चिकित्सालय व होनाई डिस्ट्रीब्युटर्स यांच्यावतीने व्यसनमुक्ती अभियानाला सुरवात. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

तासगावातून जय वैभवलक्ष्मी आयुर्वेदीक चिकित्सालय व होनाई डिस्ट्रीब्युटर्स यांच्यावतीने व्यसनमुक्ती अभियानाला सुरवात.

 तासगावातून जय वैभवलक्ष्मी आयुर्वेदीक चिकित्सालय व होनाई डिस्ट्रीब्युटर्स यांच्यावतीने व्यसनमुक्ती अभियानाला सुरवात.

राजू थोरात -तासगांव भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यसनमुक्ती अभियान चालू केले आहे, त्यास अनुसरून

तासगावातील आयुर्वेदिक नाडी तज्ञ डॉ मनिषाताई गुरव व होनाई डिस्ट्रीब्युटर्सचे गणेश पाटील यांनी तासगावातून व्यसनमुक्तीचा प्रारंभ केला.

नाडी तज्ञ डॉक्टर मनिषा ताई गुरव यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितले आज पासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत व्यसनमुक्ती अभियान राबवुया.

घरा घरात जाऊंन हा संदेश जोमाने राबवूया. खऱ्या अर्थाने तासगाव पासून हे अभियान सुरु होते याचा मला व गणेश पाटील सरांना सार्थ अभिमान आहे.

यावेळी रुग्णांनी अभियानाच्या सार्थक डॉक्टर मनिषा ताई गुरव यांची नारळ तुला करून नारळ वाटन्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबुराव गुरव व वसंतआबा चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन झाले. तर कार्यक्रमास भवानीनगरचे संतोष चव्हाण, हातनूरचे भाजप नेते विलास भाऊ पाटील, तासगाव शहरातील तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते

No comments:

Post a Comment