"सन्मान माणुसकीचा अभियाना"अंतर्गत तृतीय पंथीयांचा आमदार अरुण लाड यांचे हस्ते सन्मान - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

"सन्मान माणुसकीचा अभियाना"अंतर्गत तृतीय पंथीयांचा आमदार अरुण लाड यांचे हस्ते सन्मान

 "सन्मान माणुसकीचा अभियाना"अंतर्गत तृतीय पंथीयांचा आमदार अरुण लाड यांचे हस्ते सन्मान 

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी महिला पदाधिकारी

 उमेश पाटील -सांगली  समाजाकडून तृतीय पंथीयांना माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे यासाठी "सन्मान माणुसकीचा" या उपक्रमाअंतर्गत त्यांच्यासाठी मदतीचा हात देऊ असे आश्वासन आमदार अरुण(अण्णा) लाड यांनी दिले.ते कुंडल (ता पलूस) येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान माणुसकीचा ही योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

आमदार लाड म्हणाले, आजच्या काळात अजूनही पूर्वग्रहदूषित गैरसमजांचा सामना हे लोक करत आहेत, त्यांना समाजात माणूस म्हणून वागणूक मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून काम केले जात आहे. यातूनच एल जी बी टी सेल ची स्थापना सुद्धा केली आहे. या तृतीयपंथी समाजाने माणूस म्हणून जी मदत महापुराच्या काळात आणि कोरोनाच्या काळात केली आहे ती अभिनंदनीय आहे. या समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे या सेलच्या माध्यमातून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी चांदना मुल्ला, मधू केंगार, माही माने, सनी बुधावले, धनश्री हेमडकर हे तृतीयपंथी उपअस्थित होते तर प्राजक्ता जाधव, वैष्णवी जंगम तसेच युवती पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment