Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. -आमदार मानसिंगराव नाईक

 आरोग्यासाठी  स्वच्छता महत्वाची आहे. -आमदार मानसिंगराव नाईक

उमेश पाटील -सांगलीआरोग्यासाठी  स्वच्छता महत्वाची आहे.यासाठी सर्वांचा सहभाग व सक्रियता असणे महत्त्वाचे आहे . शहराच्या सुरक्षेसाठी शहरात सिसिटीव्ही बसविण्यात येणार आहेत असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.


 शिराळा नगरपंचायत मार्फत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जनजागृतीपर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा सौ सुनीता निकम ,विजयराव नलवडे , उपनगराध्यक्ष विजय  दळवी , 

सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिराळा नगरपंचायतने घेतलेल्या लघुपट स्पर्धेत प्रितम निकम यांच्या 'कर्तव्य , एक सामाजिक बांधिलकी' या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला.प्रा.रावसाहेब कांबळे यांच्या लघुपटास व्दितीय, तर  डॉ. शिवाजीराव चौगुले यांच्या लघुपटास तृतीय क्रमांक मिळाला.

आमदार नाईक म्हणाले की,स्वच्छता फक्त नगरपंचायत किंवा प्रशासनाने करावी अशी भावना न ठेवता आपले घर , आपले कुटुंब स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. राज्यात अग्रेसर राहील यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे.शहरासाठी पुढील ४०वर्षे पाणी कमी पडणार नाही यासाठी नवीन पाण्याची टाकी , रायझिंग पाईपलाईन याचे काम सुरू होईल. तसेच भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक करणे , गोरक्षनाथ परिसर पर्यटन म्हणून विकसित करण्यासाठी लवकरच अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. या कामांमुळे शहराचा विकास होईल. अग्निशमन व्यवस्था , नगरपंचायत साठी  इमारत आदी साठी येत्या महिन्याभरात जागा उपलब्ध होईल. शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण व काँक्रीटीकरण झाले आहेत. तालुक्यात ४० हजार नागरिक मुंबई आदी ठिकाणाहून आले, तरीही उपजिल्हा रुग्णालयामुळे आपण कोरोना ला लांब ठेऊ शकलो.

यावेळी  प्रतिभा पवार , माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे , माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के , विश्वाप्रताप नाईक ,  संपतराव शिंदे , विश्वास कदम , प्रमोद नाईक , किर्तीकुमार पाटील, राजू नाईक , संजय हिरवडेकर, आशाताई कांबळे , मोहन जिरंगे ,बसवेश्वर शेटे , पृथ्वीसिह नाईक, अर्चना गायकवाड , सुनील कवठेकर , नयना कुंभार , सुभाष इंगवले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सुविधा पाटील , सुत्रसंचलन अर्चना गायकवाड यांनी केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies