खालापुरात दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते लाच घेताना अटक, - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

खालापुरात दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते लाच घेताना अटक,

खालापुरात दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते लाच घेताना अटक, पाच लाखाची मागितली होती लाच ,

  लाचलुचपत विभाग रायगड यांनी केली कारवाई, 

दत्ता शेडगे-खालापूर

 दस्तऐवज नोंदणी कामी लाचेचा पहिला हप्ता एक लाख रूपये घेताना खालापूर दुय्यम निबंधक सुरेंद्र शिवराम गुप्ते(वय53,सध्या रा.कर्जत.मूळ नाशिक)याला लाचलुचपत विभाग रायगड यानी रंगेहाथ पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.बांधकाम  व्यावसायिक किशोर बाफना यानी खालापूर तालुक्यात  खरिवली व नंदनपाडा भागात जमिन खरेदि केली होती.


या जमिनीचे दस्त नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक गुप्ते यानी पाच लाखाची मागणी बाफना यांचेकडे केली होती.तडजोडी अंती साडेतीन लाख रूपये देण्याचे ठरले होते.दरम्यान बाफना यानी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर गुप्ते याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.सोमवारी राञी चौक फाटा येथे  स्वराज्य हाॅटेलमध्ये ठरलेल्या लाचेची रक्कम पैकी एक लाख रूपये स्विकारताना सुरेंद्र गुप्ते याला पकडण्यात आले.हि कारवाई लाचलुचपत विभाग रायगडच्या पोलीस उप अधीक्षक एन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक एस गलांडे करित आहेत.    खालापूर येथे निबंधक कार्यालय सुरू झाल्यापासून पाच वर्षात दुसरी कारवाई असून या अगोदर लादे या दुय्यम निबंधकाला पकडण्यात आले होते.त्यानंतर हि दुसरी कारवाई आहे.आदिवासी जमिनी विक्रीचा मोठा सपाटा सध्या तालुक्यात सुरू असून यामध्ये राजकिय मंडळी आणि प्रशासकिय अधिकारी देखील आघाडीवर असून या रॅकेटचा पर्दाफाश व्हावा अशी मागणी आदिवासी संघटना करत आहेत.


No comments:

Post a Comment