म्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

म्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता

 म्हसळा तालुका ग्राम पंचायत निवडनिकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,तीन पैकी एक ग्राम पंचायत बिनविरोध तर दोन ग्राम पंचायतीमध्ये एकहाती सत्ता

अरुण जंगम-म्हसळादिनांक 15 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत म्हसळा तालुक्यात लिपणीवावे आणि पाभरे या मोठया लोकसंख्या असलेल्या ग्रुप ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूकित स्थानिक व मुंबई निवासी जनतेने विकास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.7 सदस्य संख्या असलेल्या केलटे ग्रुप ग्राम पंचायती मध्ये स्थानिक पातळीवर होणारी निवडणूक आधीच बिनविरोध करून या ग्राम पंचायत तीने तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताबेत असलेल्या लिपणीवावे आणि पाभरे ग्रुप ग्राम पंचायतमध्ये बहुतांश सदस्यांची बिनविरोध निवड करून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा गड अबाधित ठेवला होता.9 सदस्य संख्या असलेल्या लिपणीवावे ग्रुप ग्राम पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य बिनविरोध निवडुन आले होते तर तीन सदस्यांसाठी प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परस्परविरोधी 6 उमेदवार निवडणुकीला उभे ठाकले होते आज संपन्न झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तिनही उमेदवार बहुमताने निवडुन आले आहेत येथे सर्वसाधारण स्त्री करिता आरक्षित असलेल्या दोन राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीमती कडु शमीम हासिम विरुद्ध काँग्रेसच्या जोगीलकर मुमताज अ.मूनाफ यांच्यात लढत होती श्रीमती कडु यांना 239 मते तर जोगीलकर यांना अवघी 68 मते मिळाली. याच प्रभागात दुसऱ्या जागेवर काँग्रेसच्या जोगीलकर शैनाज रियाज विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघरे रसिका नामदेव यांच्यात लढत झाली त्यामध्ये श्रीमती वाघरे यांना 235 मते तर शैनाज यांना अवघी 58 मते मिळाली आहेत याच प्रभागात सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारी शहनाज महमद सईद विरुद्ध काँग्रेसच्या जोगीलकर जाहिद अ.रशीद यांच्यात लढत झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे कारभारी यांना 246 तर काँग्रेसचे जोगीलकर यांना अवघे 52 मते मिळाली आहेत.लिपणीवावे ग्राम पंचायत मध्ये 9 पैकी 9जागा मिळवुन एकहाती सत्ता कायम राखली आहे. 

11 सदस्य संख्या असलेल्या पाभरे ग्राम पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जागा बिनविरोध आल्या आहेत दोन जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत झाली,प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामप्र स्त्री करिता एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेटकर जागृती जयेश विरुद्ध भाजपच्या काप सानिया कल्पेश यांच्यात लढत झाली यामध्ये बेटकर जागृती यांना 367 तर भाजपच्या काप यांना 155 मत मिळाली,प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसुचित जातीकरिता मोरे रमेश चंद्रकांत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपचे कासारे आदेश अनंत अशी सरळ लढत होती या ठिकाणी मोरे यांना 161मत तर कासारे यांना 86 मत मिळुन येथे दोन्ही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक होण्या आधीच बिनविरोध सदस्यांची निवड करून लिपणीवावे आणि पाभरे ग्राम पंचायतीवरील वर्चस्व कायम केले होते केवळ विरोधाला विरोध म्हणुन औपचारिकता म्हणुन निवडणूक झाली त्यातही विरोधकांचा पराजय झाला आहे.बिनविरोध आणि निवडुन आलेल्या विजयी उमेदवारांचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,प्रदेश चिटणीस अली कौचाली,जिप सभापती बबन मनवे,सभापती उज्वला सावंत,उपसभापती गायकर,पस सदस्य संदीप चाचले, माजी सभापती छाया म्हात्रे, नाजीम हसवारे,महेश शिर्के,फैसल गीते,जयंत चिबडे यांनी अभिनंदन केले आहे. ग्राम पंचायत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणु अधिकारी तथा तहसीलदार के. टी.भिंगारे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment