सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन, पुणे करणार
रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळांचा सन्मान
शाळेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याचे आवाहन
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम
पुण्यातील सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या व ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्या शाळेचा सन्मान करण्यात येणार आहे. एक हजार रुपये, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा, तर प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन मुख्याध्यापकांचा सन्मान केला जाणार आहे. 'सूर्यदत्ता'च्या 'सूर्यदत्ता विद्यार्थ्यांच्या गावी' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा व त्यांचा गौरव करण्याचा हा कार्यक्रम होणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात सूर्यदत्ता हा उपक्रम राबवत आहे. याआधी नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर आदी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यासाठीचा हा कार्यक्रम रोहा येथे पुढील आठवड्यात होणार असून, त्याची सविस्तर माहिती लवकरच कळवली जाईल.जे विद्यार्थी २०२० मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत आपल्या शाळेत पहिले आले असतील, त्यांनी किंवा त्यांच्या शाळांनी संस्थेशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व इतर तपशील सादर करावयाचा आहे. विद्यार्थी-शाळांनी माहिती कळविण्याची अंतिम मुदत ८ जानेवारी २०२१ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया (९८८१४९००३६) किंवा माध्यम समन्वयक जीवराज चोले (९७६७७८९५२९) यांच्याशी संपर्क साधावा.