छावा मराठा संघटना सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

छावा मराठा संघटना सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर

छावा मराठा संघटना सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर 

उमेश पाटील -सांगलीशिराळा:- छावा मराठा संघटना सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये शरद महादेव नायकवडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष तर रवींद्र भिवा पवार सांगली जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती ही पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप बाळकृष्ण कदम संपर्कप्रमुख सौ सविता दमामे व सांगली जिल्हा अध्यक्ष बापुसो सुबराव कदम यांच्या हस्ते करण्यात आली.छावा मराठा संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून सामाजिक काम करणाऱ्या तरुण-तरुणींना एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणारी संघटना आहे. ही संघटना प्रत्येक गावात पोचविण्यासाठी व सामाजिक उपक्रम करण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप कदम यांनी व्यक्त केले.               यावेळी शिराळा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये शिराळा तालुका अध्यक्ष पोपट रघुनाथ पाटील, शिराळा तालुका सरचिटणीस अनिल यशवंत आंबार्डेकर, शिराळा तालुका सचिवपदी दिलीप जगन्नाथ कदम इत्यादींची निवड करण्यात आली.                    तसेच प्रत्येक तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करून संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. नवीन तरुणांना सामाजिक काम करण्याची संधी दिली जाईल असे मत जिल्हाध्यक्ष बापूसो कदम यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment