कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, January 14, 2021

कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध निवड

 कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदी सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध निवड

नरेश कोळंबे-कर्जत   कर्जत तालुक्यातील पंचायत समिती सभापतीपदी सेनेच्या सुषमा भानुदास ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याआधी सुजाता दीपक मनवे  या पंचायत समिती सभापतीपदी विराजमान होत्या.

 कर्जत तालुक्यातील पंचायत समिती सभापती पद सुजाता मनवे यांच्या कडे होते  त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर या पदासाठी आज दि 14 रोजी सेनेकडून जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे यांच्या स्नुषा सुषमा ठाकरे  यांची निवड करण्यात आली आहे. गौरकामथ विभागातून निवडून आलेल्या  सुषमा भानुदास ठाकरे यांची सुजाता मनवे यांच्या नंतर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सेनेचा भगवा ध्वज पुन्हा एकदा कर्जत पंचायत समिती वर पाहायला मिळाला आहे.            यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख यांनी काम पाहिलं.कर्जत खालापूर आमदार महेंद्र थोरवे, माजी सभापती मनोहर थोरवे , तसेच सेनेचे भाई गायकर, अमर मिसाळ, संकेत भासे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

गौरकामत विभागातून निवडून आलेल्या रेखा ठाकरे यांच्या सूनबाई सुषमा भानुदास ठाकरे ह्यांची कर्जत तालुका पंचायत समिती सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. ह्या नक्कीच कर्जत तालुक्यासाठी चांगल काम करतील. अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. आम्हा सर्व सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडीमुळे आनंदाचे वातावरण आहे.

                - महेंद्र थोरवे ( आमदार , कर्जत खालापूर)

No comments:

Post a Comment