Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हाय टेन्शन लाईनचा झटका लागुनही घुबडाचा जीव वाचला संक्रांत टळली

 हाय टेन्शन लाईनचा झटका लागुनही घुबडाचा जीव वाचला संक्रांत टळली

रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव

गेल्या आठवड्यात उतेखोल येथील वाॅटरसप्लाय रोड परिसरात काही दिवसाच्या अंतराने अचानकपणे सकाळचे वेळी एका मागोमाग एक अशी दोन गव्हाणी घुबडे  मेलेल्या अवस्थेत आढळली. प्राथमिक अंदाजा नुसार सध्या चर्चेत असलेला बर्डफ्ल्यू रोगाने किंवा विषारी उंदीर खाल्याने विषबाधेने कदाचीत ती मृत होत असावीत असे वाटत होते पण प्रत्यक्षात मात्र ती परिसरातील महावितरण च्या हायटेन्शन लाईनच्या पोलवरील चिनी मातीच्या डिशवर बसल्याने इकडे तिकडे पंख लागुन  झटका बसल्याने खाली पडुन मृत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.         प्रत्यक्षदर्शी प्रस्तुत पत्रकार बुधवारी रात्री दहा वाजता घरा समोरील रस्त्यावर निवांत फिरत असताना जवळच असलेल्या हाय टेन्शन लाईन च्या पोलवर कसलातरी आवाज झाला. पोलवरुन काहीतरी खाली पडल्याचे जाणवले पण काळोखात काही दिसत नव्हते. जवळ जाऊन पाहीले असता एक पुर्ण वाढ झालेले गव्हाणी घुबड फडफडताना दिसले, त्याच्या दिशेने दोन तीन भटकी कुत्री त्याला हुंगत आली. शाॅक लागल्याने त्याला उडता येत नव्हते. आता ती कुत्री त्याच्यावर झडप घालणार हे लक्षात आल्याने त्या कुत्र्यांना तिथून हाकलले. आणि प्रस्तुत पत्रकार यांनी आपला मुलगा शंतनुच्या मदतीने शाॅक लागुन लुळ्या पडलेल्या घुबडाला उचलले व घराच्या अंगणात उजेडात आणले. 


         त्याचे निरिक्षण केले असता त्याला जखमा झाल्यात नव्हत्या. मात्र झटका लागल्याने त्याचे संपूर्ण शरिर धडधडत होत. शंतनुने त्याला अलगद धरुन डोक्यावरुन हात फिरवल्या नंतर त्याची धडधड कमी झाली ते शांतपणे सगळ्यांकडे टकमक पाहू लागले. दरम्यान आमचे शेजारील कुटुंबिय कुतूहलाने घुबड पाहण्यासाठी आले, त्यांचा लहान मुलगा मांगिरीष कुतूहलाने घुबडाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागला. जवळपास एक तास घुबडावर लक्ष ठेऊन नंतर त्याला पाणी पाजुन, समोरील चार मजली इमारतीच्या गच्चीवर घुबडांचे वास्तव्य असलेल्या कोनाड्यात त्याला सुरक्षित सोडले आहे. काल बुधवार भोगी व दुसरे दिवशी मकरसंक्रांत असल्यामुळे अस म्हणने वावगे ठरु नये, घुबडाचे जीवावर आली होती संक्रांत पण दैव बलवत्तर म्हणुन ते बचावले. 

        आपल्या संस्कृतीत लक्ष्मीचे वहान असलेल्या घुबडा बद्दल अनेक दंतकथा, वेगवेगळे समज आहेत. रात्री चित्कारुन एखादे लहान मुल रडतेय, हसतेय असे आवाज ते काढते. त्यामुळे एक भयाण वातावरण तयार होऊन भितीदायक वाटते. तसेच घुबड घरात आणु नये, त्यामुळे नुकसान होते असे समजतात. परंतु प्रत्यक्षात मात्र घुबड अतिशय निरुपद्रवी असुन निसर्गचक्रातील या पक्षाची भुमिका अत्यंत महत्वाची असुन हा निशाचर पक्षी, मानवाचा व शेतकऱ्याचा मित्र म्हटल्यास वावगे ठरु नये. ही घुबडं अन्नधान्य कुरतडून खाणारे उपद्रवी उंदीर पकडून खातात त्यामुळे धान्याची नासाडी व नुकसान टळते. आज एका घुबडावर आलेली संक्रात टळली त्याचा जीव वाचला याचे समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies