संजय इधे यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेचा महाराष्ट्र शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

संजय इधे यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेचा महाराष्ट्र शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

 संजय इधे यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेचा महाराष्ट्र शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

 सुधाकर वाघ-मुरबाड


पुरोगामी विचारांनी प्रेरित आणि समाजहितासाठीचे विचार जनमाणसांत पेरून समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष आणि पद्मश्री अण्णासाहेब जाधव ,भारतीय समाज उन्नती मंडळ संचलित सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगाव ( ता . मुरबाड ) येथील शिक्षक संजय अनंत इथे यांना नवचैतन्य सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने सन 2020 चा नवचैतन्य महाराष्ट्र शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला . येत्या 24 जानेवारीला या पुरस्काराचे वितरण रेती भवन , डोंबिवली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे . समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो .संजय इधे यांच्या कार्याची दखल घेऊन 2020 या वर्षाचा​ नवचैतन्य समाजिक संस्थेचा शिक्षकरत्न पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment