चिपळूण काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी शकील तांबे यांची निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 12, 2021

चिपळूण काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी शकील तांबे यांची निवड

 चिपळूण काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी शकील तांबे यांची निवड

 ओंकार रेळेकर-चिपळूण

येथील काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी शकील तांबे यांची निवड तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केली असून तसे पत्र नुकतेच दिले आहे. आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही शकील तांबे यांनी दिली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले शकील तांबे गेली काही वर्ष सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत.  चिपळूण लाईव्ह युट्यूब चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता करीत असताना आपली वेगळे अस्तित्वाल निर्माण केले आहे. चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन श्री. तांबे यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत असताना काँग्रेस पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याची दखल घेऊन प्रशांत यादव यांनी शकील तांबे यांच्यावर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे पत्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकतेच सुपूर्द केले. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक रमेश खळे,  युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, फैसल पिलपिले, नूर बिजले, आशक हमदूले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment