Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

तीन पैलवान एकत्र आले तरी महापालिका जिंकू

 कोरोनाकाळात शरीरसंपदेचे महत्व अधोरेखित- चंद्रकांत पाटील

तीन पैलवान एकत्र आले तरी महापालिका जिंकू

तरोनिश मेहता-पुणे 



कोरोना आपत्तीमुळे धनसंपदेपेक्षा शरिरसंपदा महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले आहे़. सुसज्ज व्यायामशाळा ही आज गरज निर्माण झाली असून, पुरूषांबरोबरच महिलांनाही व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली़. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या पेहेलवान जीमचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़. यावेळी खासदार गिरीष बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनित जोशी, पेहेलवान जीमचे संचालक सागर धारिया, पेहेलवान जीमची संकल्पना मांडणारे नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित होते़.

चंद्रकांत पाटील म्हणाले, नगरसेवकांनी आपण एका प्रभागाचे नगरसेवक आहोत ही भावना न ठेवता, संपूर्ण शहराचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे़. रस्ते, गटर यात न अडकता शहराची काय आवश्यकता आहे ती पूर्ण करणे ही नगरसेवकांकडून नागरिकांची अपेक्षा असते़ ती पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत़.

एका प्रभागातील चार नगरसेवक एकत्र आल्यावर किती चांगले काम होते़ याचे उत्तम उदाहरण या पेहेलवान जीमच्या माध्यमातून व पोटे यांच्या प्रभागातून दिसून येत असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले़.  आपल्या प्रास्ताविकपर भाषणात दीपक पोटे यांनी पेहेलवान जीम मागील संकल्पना विशष करून, ही जीम प्रति दिन दहा रूपये शुल्काने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले़ 

व्यायामशाळेच्या उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रात पेहेलवान जिम गेली ३० वर्षापासून कार्यरत आहे. लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्याबरोबरच शारीरीक फिटनेसाठी २०१५ पासून पेहेलवान जिम सुरु करण्यात आली. सर्वसामान्यांना फिटनेसबाबत असामान्य बनविने हे पेहेलवान जिमचे वैशिष्ठ्ये आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील लोकांसाठी सुलभ आणि परवडण्याजोग्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत नळस्टॉपजवळील शाखा सुरु करण्यात आली आहे. भारतातील एकमेव हार्डकोअर व्यायामशाळेची साखळी म्हणजे पेहेलवान जिम आहे. सामान्य माणसासाठी अतिशय मैत्रीपूर्ण आणि किफायतशीर असे आमचे मॉडेल आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही उत्कटतेने फिटनेस व्यावसायिक शोधत असल्याचे पेहेलवान जिमचे संचालक सागर धारिया म्हणाले.

तीन पैलवान एकत्र आले तरी महापालिका जिंकू

पुणेकर जनता आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुण्याची महापालिका जिंकू. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असेही यावेळी पाटील यांनी सांगितले. पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या 'पेहेलवान जिम' चे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies