Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

उस्मानाबाद जिल्ह्यात "राष्ट्रपतीने" घेतला जन्म

 उस्मानाबाद जिल्ह्यात "राष्ट्रपतीने" घेतला जन्म

राम जळकोटे- उस्मानाबादउस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district ) राष्ट्रपती जन्माला आल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. दरम्यान या चर्चेला कारण देखील तसच आहे. दरम्यान आपण अनेकदा ‘बस नाम हि काफी है’, ‘नावात सर्व काही आहे’, असे डायलॉग्ज अनेक वेळा ऐकत असतो. त्याच प्रकारे उस्मानाबादेत देखील घडलं आहे. उस्मानाबाद जिल्यातील उमरगा तालुक्यातील (umarga taluka) चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी त्यांच्या मुलाचे नाव “राष्ट्रपती” असे ठेवले आहे. त्यामुळे उस्मानाबादेत राष्ट्रपती जन्मल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रपती हा चर्चेचा विषय ठरला आहे.  


*या कारानमुळे मुलाचं नाव राष्ट्रपती  ठेवले- दत्ता चौधरी*


राष्ट्रपती या पदाचा संपूर्ण देशाला अभिमान असतो. राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद असून, या पदाचा संपूर्ण देशाला अभिमान असतो. दरम्यान या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबातही राष्ट्रपती असावा अशी संकल्पना असावी म्हणूनच मुलाचे नामकरण राष्ट्रपती असे केले आहे. अशी प्रतिक्रिया मुलाचे वडील दत्ता चौधरी यांनी दिली आहे.


राष्ट्रपती ठेवल्याने भविष्यात त्यांचा मुलगा राष्ट्रपती होईल


दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हंटल आहे कि, मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवल्याने भविष्यात त्यांचा मुलगा राष्ट्रपती देखील होऊ शकतो, असा विश्वास त्याच्या वडिलांना वाटत आहे. दरम्यान त्यांच्या या राष्ट्रपती मुलाची चर्चा मात्र संपूर्ण जिल्हाभर रंगू लागली आहे.


*दुसरं अपत्य झाल्यास त्याचे नाव प्रधानमंत्री ठेवण्याचा संकल्प*


दरम्यान त्यांनी असं देखील म्हंटल आहे कि येत्या काळात जर दुसरं अपत्य झाल्यास त्याचे नाव प्रधानमंत्री ठेवणार असल्याचा संकल्प देखील दत्ता चौधरी यांनी केला आहे.


*१९ जून २०२० रोजी ‘राष्ट्रपतीचा’ झाला होता जन्म*


दत्ता चौधरी आणि कविता चौधरी यांना १९ जून २०२० रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. तेव्हापासून कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. नुकतेच या मुलाचे बारसे झाले. तेव्हा कुटुंबीयांनी या मुलाचे नाव चक्क राष्ट्रपती असे ठेवले. जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतुन राष्ट्रपती दत्ता चौधरी या नावाने जन्म प्रमाणपत्र घेतले. त्यानंतर नुकतेच या नावाचे आधारकार्डही काढून घेतले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies