बीए.बीएड शिक्षण घेतलेल्या आदिवासी तरुणाची शेतीला पसंती
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्यालगत वसलेल्या दुधनोली या आदिवासी गावातील दिपक नामदेव घिगे या सुशिक्षित तरुणाने नोकरीपेक्षा आधुनिक शेतीतुन चांगले उत्पन्न घेण्याकडे पसंती दर्शविली आहे.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्ददल मुरबाड तालुक्यामधुन दुधनोली गावचा तरुण दिपक नामदेव घिगे यांना ठाणे जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचा सन 2018 सालचा "प्रगतीशिल शेतकरी पुरस्कार " (आदिवासी गट) मिळाला आहे. दुधनोली गावातील दिपक घिगे या आदिवासी तरुणाने इतिहास विषयात बि.ए.बीएड शिक्षण घेतले आहे. परंतु शिक्षण क्षेत्रीतील परिस्थितीचा विचार करुन शेतीतील आधुनिक पद्धतीने वेगवेगळी पिके घेऊन स्वत: शेतात राबुन दरवर्षी नवनविन पिके घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीसाठी त्याने स्वत: शेंद्रीय पध्दतीचा वापर केला आहेद पिकांसाठी वापर केला आहे.तसेच कडुलिंबाच्या बिया, पाने कुजवुन त्यापासुन निंबोळी अर्क, स्वत: तयार करुन तसेच शेणखताचा वापर करुन नैसर्गिक पद्धतीने पिके घेतली आहेत. या साठी त्यांना पं.स.कृषि विभाग व जि.प.कृषि विभाग मुरबाड यांनी विशेष सहकार्य केले.पं.सं मुरबाड कृषि विभागाच्या आदिवासी उपयोजन अंतर्गत योजनेतुन पंपसंच, पाईप, स्प्रे इत्यादी कृषि औजारांचा वापर करुन सिंचन क्षेत्रात वाढ केली .हा तरुण शेतकरी दरवर्षी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करुन अनेक पिके घेत आसतो. लॉकडाऊनच्या काळात फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या वर्षीही मल्चिंग पेपरचा वापर करुन वांगी, मिरची लागवड केली आहे. त्याने स्वत: शेती विषयक माहितीचा अभ्यास करुन या आधुनिके शेतीला पसंती दर्शवली आहे.त्याचा आदर्श मुरबाड तालुक्यातील तरुण वर्गाने घेणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही यावर्षीही मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेंडी, वांगी, काकडी यासारख्या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असुन या सर्व सामान्य शेतकऱ्यांवर पुन्हा गेल्या वर्षासारखे नुकसान होण्याची वेळ येऊ नये ही अपेक्षा प्रगतिशील शेतकरी दिपक घिगे यांनी व्यक्त केली.