खानापूर ग्रामपंचयातीवर वसंतराव वडगावे पॅनलचे वर्चस्व कायम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

खानापूर ग्रामपंचयातीवर वसंतराव वडगावे पॅनलचे वर्चस्व कायम

 खानापूर ग्रामपंचयातीवर वसंतराव वडगावे पॅनलचे वर्चस्व कायम 

राम जळकोटे-उस्मानाबाद तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथील सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने सात पैकी सहा जागांवर विजय मिळवून  ग्रामपंचयातवर निर्विवाद  वर्चस्व प्रस्थापित करून आपला गड कायम  राखला आहे.ग्राम विकास पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठ्या उत्सहात विजयोत्सव साजरा केला.

येथील सात जागांसाठी दोन पॅनेलमध्ये निवडणूक लागली होती.यासाठी दोन्ही पॅनलकडून तगडे उमेदवार रिंगणात उभे करण्यात आले होते.15 जानेवारी रोजी झालेल्या विक्रमी मतदानानंतर सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले होते.

सत्ताधारी असलेल्या ग्रामविकास पॅनेलने आपला गड कायम राखण्यात  यश मिळवले आहे.गेल्या वीस वर्षोपासून वडगावे पॅनलचे ग्रामपंचयातवर वर्चस्व आहे.ते वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवल आहे.वसंतराव वडगावे यांच्या ग्रामविकास पॅनलचा पराभव करण्यासाठी तालुक्यातील माजी आमदार व बड्या नेत्यांनी कंबर कसली कसली होती.पॅनलचा पराभव करण्यासाठी त्यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती.परंतु वसंतराव वडगावे यांनी केलेल्या विकासकामामुळे यंदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर वसंतराव वडगावे यांच्या ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थपित केले आहे. तालुक्यातील माजी आमदार व बड्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ झाले.सलग पाचव्यांदा ग्रामपंचयातवर वसंतराव वडगावे यांच्या ग्रामविकास पॅनेलने वर्चस्व कायम ठेवले आहे.मागील काळात केलेल्या विकासकामामुळे त्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.


ग्रामविकास पॅनलचे प्रभाग क्र.एक मधून सतीश गायकवाड,रिजवानबी शेख,सुजता माळी, प्रभाग क्र.दोन मधून गुरुदेवी गोरसे तर प्रभाग क्र.तीन मधून अप्पाशा कांबळे, रंजना हिप्परगे हे उमेदवार विजयी झाले आहेत.


 विजयी उमेदवारांनी निकालानंतर आनंदोत्सव साजरा करताना जनतेने दिलेल्या कौलांबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आता जबाबदारी वाढली आहे.जनतेच्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही.आगामी काळात गावाच्या विकासावर भर दिला जाईल.तसेच सर्वांना सोबत घेतले जाईल.गेल्या वीस वर्षांपासून केलेल्या विकास कामावर जनता खुश आहे.त्यामुळे सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे .असे मत पॅनलप्रमुख वसंतराव वडगावे यांनी व्यक्त केले.ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांचे,ग्रामस्थांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment