छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरु करा; अन्यथा आत्मक्लेष उपोषण
पत्रकार सतीश कदम यांचा इशारा
ओंकार रेळेकर-चिपळूण
याबाबत दिनांक १ जानेवारी रोजी श्री.सतीश कदम यांनी मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले आहे. माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या पुतळयासाठी पुढाकार घेतला होता. नगरपरिषदेने यासाठी निधीची तरतुदही केली आहे. पत्रकार सतीश कदम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी काही नगरसेवकांसह सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासनाला काही तांत्रिक मंजुरीसाठी तत्कालीन पालकमंत्री यांचेशी समन्वय साधून सहकार्य केलेले आहे. त्यावेळी ही उपोषणाच्या इशाऱ्यानंतर काम सुरू झाले परंतु कामाच्या दर्जाबाबत मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर काम थांबविण्यात आले व आठ दिवसात त्याबाबतचा रिपोर्ट करुन दर्जा व गुणवत्ता राखत पुन्हा काम सुरू करू असे आश्वासन देण्यात आले. परंतू तेव्हापासून पूर्णतः काम ठप्प आहे. सदरचे काम कोणत्याही परिस्थितीत त्वरीत सुरु करावे. छत्रपती शिवाजी महाराज ही जाज्वल्य अस्मिता त्यांच्या प्रेरणादायी पुतळ्याच्या कामात दिरंगाई चालणार नाही अन्यथा नगरपरिषदेसमोर आत्मक्लेश उपोषणाशिवाय पर्याय नाही असे श्री.कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.