जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून स्थानिक सुटया जाहीर
राम जळकोटे-उस्मानाबाद
उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी २०२१ या वर्षातील उस्मानाबाद जिल्हयातील स्थानिक सुट्यां बाबत अधिसूचना जारी केली आहे. या मध्ये दि.२ मार्च २०२१ रोजी (मंगळवार) हजरत ख्यॉजा शमशोद्दीन गाजी दर्ग्याचा ऊरुस, दि.१४ ऑक्टोंबर २०२१ रोजी (गुरुवार) महानवमी, दि.२ नोव्हेंबर - २०२१ रोजी (मंगळवार) धनत्रयोदशी अशा स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये, कोषागार कार्यालय व इतर शैक्षणिक संस्था यांना या सुटया लागू राहतील.
ही अधिसूचना उस्मानाबाद जिल्हयातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांना व केंद्र शासनांच्या कार्यालयांना व बँकांना लागू राहणार नाही.