वैजनाथ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

वैजनाथ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व,

 वैजनाथ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, सत्ताधारी शिवसेनेला अस्मान दाखवत एका जागेवर फक्त एका मताने समाधान

महाराष्ट्र मिरर टीम-कर्जतकर्जत तालुक्यातील वैजनाथ ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता उलथवून राष्ट्रवादी काँग्रेसने 9 पैकी 8 जागेवर विजय मिळवत आपलं निनिर्वाद वर्चस्व सिद्ध केलं आहे तर एका जागेवर सेनेला आपलं खात खोलता आलं तेही एका मताने विजय मिळवत.शिवसेनेचे माजी सरपंच भगवान गुरव यांच्या दडपशाही ला झुगारून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हे मोठे यश प्राप्त करून दिले आहे.

माजी सरपंच भगवान गुरव यांच्या पत्नी योगिता गुरव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार कोमल रोशन गुरव यांनी दारुण पराभव केलाय.

वैजनाथ ग्रामपंचायतीचे सर्व विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

कातकरी समीर शिवाजी, गुरव अमित शंकर, साळोखे सुमन मारुती,हिलम शंकर महादू,मुकणे सुमन शिवाजी,गुरव कोमल रोशन,गुरव रुपाली सचिन,कातकरी यमुना समीर आणि दरेकर स्नेहल माधव

No comments:

Post a Comment