भाजप रायगड जिल्हा महिला चिटणीस सरोज मंगेश म्हशीलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश,खासदार सुनिल तटकरे यांनी केले स्वागत - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

भाजप रायगड जिल्हा महिला चिटणीस सरोज मंगेश म्हशीलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश,खासदार सुनिल तटकरे यांनी केले स्वागत

 भाजप रायगड जिल्हा महिला चिटणीस सरोज मंगेश म्हशीलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश,खासदार सुनिल तटकरे यांनी केले स्वागत

 अरुण जंगम-म्हसळाम्हसळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा महिला चिटणीस सरोज म्हशीलकर आणि त्यांचे पती रायगड जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश म्हशीलकर यांनी शनिवार दि.23 जानेवारी रोजी म्हसळा येथे रा.काँ.पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक इनामदार यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे व राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी त्यांचे सोबत अन्य सहकारी उपस्थित होते.यावेळी म्हशीलकर पती - पत्नीचे खासदार सुनिल तटकरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.पक्षप्रवेश कार्यक्रम वेळी प्रदेश कार्यकारिणी चिटणीस अलिशेठ कौचाली,रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,नगराध्यक्षा जयश्री कापरे उपनगराध्यक्ष सुहेब हलदे,गट नेते संजय कर्णिक,शहर अध्यक्ष रियाझ घराडे,जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक इनामदार,उपाध्यक्ष शाहिद उकये यांचे सह नगरसेवक,नगरसेविका व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment