अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा आ . शिवेंद्रसिंहराजे ; सभासद , शेतकरी , कामगारांचे मानले आभार
प्रतिक मिसाळ-सातारा
सातारा- राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्यावतीने २०१ ९ -२० या वर्षासाठीचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे . या पुरस्कारामुळे अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे , अशी प्रतिक्रिया कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली . दरम्यान , अजिंक्यतारा कारखान्याने सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासतानाच सहकार क्षेत्रातील आपली आदर्श वाटचाल जोमाने सुरु ठेवली आहे . कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत नेहमीच मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व सभासद , शेतकरी , कामगार कर्मचाऱ्यांचे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी या निमित्ताने आभार मानले आहेत . ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपी नुसार वेळच्या वेळी संपूर्ण पेमेंट अदा करणारा कारखाना अशी ख्याती मिळवलेल्या अजिंक्यतारा कारखान्याने राज्यात नावलौकिक मिळवला आहे . कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्यावतीने २०१ ९ -२० या वर्षासाठीचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून ही सर्वांसाठीच गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे . मिळालेल्या पुरस्कारामुळे संस्था अधिक सक्षमपणे आणि जबाबदारीने चालवण्याची प्रेरणा संचालक मंडळाला मिळणार असून आगामी काळात अजिंक्यतारा कारखाना राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श कारखाना होईल असा विश्वास व्यक्त करून आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी संचालक मंडळाच्यावतीने सभासद शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत .