अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद कडुन आदिवासी कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंची मदत
सुधाकर वाघ- मुरबाड
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेच्या मुरबाडच्यावतीने आदिवासी कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंची मदतीचा करुन दिलासा दिला.
मुरबाड तालुक्यातील अस्कोत येथील राहणारे शंकर श्रावण मुकणे व त्यांच्या मुलाचे घर रानातून वेगाने आलेल्या वणव्याच्या विळख्यात सापडून यात दोन्ही आदिवासी कुटुंबांची अर्ध कच्ची घरे पूर्णपणे जाळून खाक झाली आहेत. प्रसंगावधान राखल्याने या कुटुंबातील माणसे बचावली असून घरातील साहित्य मात्र होत्याचं नव्हतं झालं आहे . जळून खाक झालेल्या संसारात घरातील जीवनावश्यक वस्तू , अन्नधान्य , भांडी , अन्य वस्तु जळुन खाक झाले आहे. या आदिवासी कुटुंबांला मदतीचा हातभार लागावा म्हणुन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुरबाड या आदिवासी संघटनेकडुन रविवार दि.7 फेब्रुवारी रोजी घर जळीलेल्या कुटुंबांना तांदुळ, किराणा सामानाची मदत करण्यात आली .
यावेळी मुरबाड पं.स.उपसभापती अरुणा खाकर, अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, मुरबाड तालुकाअध्यक्ष नारायण सावळा, कार्याध्यक्ष नंदकुमार डामसे, कोषाध्यक्ष रघुनाथ खाकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लाड्या मेंगाळ, सुधीर घिगे आदि उपस्थित होते.