चिपळूण मधील नामवंत करसल्लागार रवींद्र घाणेकर यांचे निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, February 7, 2021

चिपळूण मधील नामवंत करसल्लागार रवींद्र घाणेकर यांचे निधन

चिपळूण मधील नामवंत करसल्लागार रवींद्र घाणेकर यांचे निधन

 ओंकार रेळेकर-चिपळूण चिपळूण मधील नामवंत करसल्लागार रवींद्र त्रिंबक घाणेकर यांचे शनिवारी रात्री १० च्या सुमारास त्यांच्या परांजपे स्कीम येथील राहत्या घरी वयाच्या  ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय आणि हितचिंतकांवर शोककळा पसरली आहे.अत्यंत शांत, संयमी ,मनमिळाऊ स्वभावाचे असलेले रवींद्र घाणेकर यांचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नामांकित कर सल्लागार म्हणून नाव लौकिक होते,बहाद्दूरशेख नाका जवळील साहिल आर्केड येथे त्यांचे कार्यालयात आहे,चिपळूण आणि संपूर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक,दुकानदार , कंत्राटदार आणि उद्योजक यांची अकाऊंटिंग मधील त्यांच्याकडे कामे असायची त्यांच्या या  सुमारे ३५ वर्ष सुरू असलेल्या व्यवसायात त्यांचे जेष्ठ चिरंजीव पुष्कर घाणेकर सहकार्य करायचे.

स्वर्गीय रवींद्र घाणेकर यांच्या पश्चात पत्नी सुहासिनी रवींद्र घाणेकर,मुलगा पुष्कर रवींद्र घाणेकर,मुलगी अनुश्री रवींद्र घाणेकर आहेत, आज रविवारी सकाळी १० वा. रामतीर्थ येथे त्यांच्यावर  अत्यसंस्कार करण्यात आले,सोमवार दि.१५ फेब्रुवारी रोजी घाणेकर यांच्या पुणे येथील निवास्थानी दशक्रिया विधी होणार असून गुरुवार दि.१८ फेब्रुवारी रोजी तेरावे पुणे येथे होणार आहे,घाणेकर यांच्या निधनाची बातमी कळताच जिल्हापरिषद सदस्य विक्रांत जाधव,उद्योजक दीपक पवार,उद्योजक अजय देवधर,नितीन गांधी,सुधीर तलाठी,प्रकाश जोशी,पोफळी माजी सरपंच चंद्रकांत सुवार,उमेश जोशी ,गजानन लोकरे,पराग लोकरे यांसह चिपळूण मधील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी कुटुंबियांचे सांत्वन केले.

No comments:

Post a Comment