रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार थेट खोपोलीतून - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, April 30, 2021

रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार थेट खोपोलीतून

 रेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार थेट खोपोलीतून

पुणे ग्रामीण पोलिसांनी त्रिकूटला घेतले खोपोलीतून ताब्यात

मिलिंद लोहार-पुणे
महाराष्ट्र मिरर टीमरेमेडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या त्रिकूटाला आज नारायणगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांना जुन्नर कोर्टाने आज 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोहन शेखर गणेशकर याच्याकडून पुणे ग्रामीण पोलिसांनी 3 रेमेडिसीवर व एक मोबाईल जप्त केला होता त्याची कसून चौकशी केली असता हे रेमेडिसीवर इंजेक्शन खोपोली जिल्हा रायगड येथील स्वप्निल सुनील देशमुख(गुरव) वय 19 वर्ष राहणार विठ्ठल मंदिरासमोर वरची खोपोली, आकाश प्रकाश कलवार वय 25 वर्ष राहणार लोहाना हॉल समोर,कल्पतरू अपार्टमेंट दुसरा मजला, विनोद जगदीशप्रकाश जाकोटीया वय 40 वर्ष राहणार विनोद बिल्डिंग सिरॅमिक्स-शास्त्रीनगर खोपोली यांचेकडून घेऊन गरजू पेशंटच्या नातेवाईकांना प्रत्येकी वीस हजार रुपयांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुरुवारी ताब्यात घेतलेल्या खोपोलीतील त्रिकूटाकडे पोलिसांनी अधिक चौकशी करता ते इंजेक्शन आम्हीच दिले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी त्यांना आज शुक्रवारी अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर गुन्ह्याचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,पो.ना.धनंजय पालवे,पो.कॉ. शैलेश वाघमारे, पो. कॉ.सचिन कोबल यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment