Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले फौजदाराचे तडकाफडकी निलंबन

तरुणीने केलेल्या तक्रारीची दखल

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले फौजदाराचे तडकाफडकी निलंबन

रक्षक बनत होता भक्षक

 मिलिंद लोहार-पुणे



चहा पिण्याच्या बहाण्याने तक्रारदार तरुणीच्या घरातून अॅपल कंपनीचे महागडे घड्याळ चोरल्याप्रकरणी फौजदारचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले . पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी ( दि .३० ) याबाबचे आदेश दिले आहेत . प्रशांत राजेंद्र रेळेकर ( नेमणूक - हिंजवडी पोलिस ठाणे ) असे निलंबित फौजदाराचे नाव आहे . याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी की , तक्रारदार तरुणीचा भाऊ बेपत्ता आहे . याबाबत २४ एप्रिल रोजी तरुणी तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा हिंजवडी पोलिस ठाण्यात गेली . त्यावेळी तक्रार घेतल्यानंतर रेळेकर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला . दरम्यान , गाडीमध्ये " आपण कधीही हॉटेलवर जाऊ शकतो , मी तुमच्यासाठी कोणतेही हॉटेल उघडायला सांगेन . मी उद्या मिरजेला चाललो आहे . तू पण माझ्यासोबत चल , ' असे बोलून लगट करण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने रेळेकरला नकार दिला . घरी पोहचल्यानंतर रेळेकरने " आपण खूप कंटाळलो आहे " असे सांगून तरुणीकडे चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली . तरुणीने नाईलाजास्तव रेळेकरला चहा पिण्यासाठी घरात घेतले . त्यावेळी तरुणीची आई देखील घरात होत्या . दरम्यान , चहा पिताना रेळेकर याने चार्जिंगला लावलेलं अॅपल कंपनीचे घड्याळ खिशात घातले . त्यानंतर तरुणीने दुसऱ्या दिवशी ठाण्यात धाव घेत वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला . वरिष्ठांनी झाडाझडती घेतल्यानंतर रेळेकरने तरुणीचे घड्याळ माघारी दिले . रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत कृष्ण प्रकाश यांनी त्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत . 

 

चुकीला माफी नाही



सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने जर कोणीही गैरप्रकार करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही . सगळीकडे असे प्रकार घडत असतात . मात्र , पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली जाईल , या भीतीने प्रकरण दाबण्यात येत . मात्र , माझ्याकडे चुकीला माफी नाही . मी कोणालाही पाठीशी घालत नाही . 

-कृष्ण प्रकाश , पिंपरी-चिंचवड आयुक्त,पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies