आ.शशिकांत शिंदे यांचा ग्रामीण भागात संपूर्ण औषधे पुरविण्याचा निर्णय स्तुत्य : ना . बाळासाहेब पाटील
प्रतीक मिसाळ कोरेगाव
कोरेगाव तालुक्यातील एकंबे , बिचुकले आणि नलवडेवाडी ( बिचुकले ) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती , मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट , ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करुन देत चांगला निर्णय घेतला आहे , असे प्रतिपादन पालकमंत्री ना . बाळासाहेब पाटील यांनी केले . आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून एकंबे येथे ५०० , बिचुकले येथे शंभर आणि नलवडेवाडी ( बिचुकले ) येथील ५० कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट , ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था केली असून , या साहित्याचे वितरण गुरुवारी दुपारी पंचायत समितीमध्ये ना . पाटील यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते . आमदार शशिकांत शिंदे , सभापती राजाभाऊ जगदाळे , माजी सभापती संजय झंवर , रमेश उबाळे , डॉ . गणेश होळ , डॉ . नितीन सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती . ना . पाटील पुढे म्हणाले की , राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले असून , सर्वसामान्य जनता त्याचे पालन करत नाही , हे दुर्दैवी आहे . ग्रामीण भागात नियमांचे पालन होत नसल्याने एकंबे , बिचुकले आणि नलवडेवाडी ( बिचुकले ) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे .
वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आ . शशिकांत शिंदे यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे . आ . शशिकांत शिंदे म्हणाले की , एकंबे गावाने कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरु केल्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन अधिकाधिक तपासणी करण्याबाबत सूचना केल्या . स्वत : गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि शासनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या . आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत केले असून , तेथे चार बेड्सची व्यवस्था केली आहे . ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे , त्यांच्यावर प्राथमिक उपचार तेथेच होतील अशी व्यवस्था केली आहे . भविष्यकाळात आणखी गरज लागल्यास औषधोपचार कीट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत . कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेचे शहराध्यक्ष सनी शिर्के , अजित बर्गे , बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार , एकंबे येथील माजी सरपंच हणमंत मदने , बाळासाहेब कदम , केतन चव्हाण , अतुल चव्हाण , विकास शिंदे उपस्थित होते .