Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

देगाव पाझर तलावाच्या दुरुस्ती कामास निधी कमी पडू देणार नाही:आ.शशिकांत शिंदे

 देगाव पाझर तलावाच्या दुरुस्ती कामास निधी कमी पडू देणार नाही:आ.शशिकांत शिंदे

प्रतीक मिसाळ -सातारा देगाव ता . सातारा येथे १ ९ ७२ साली पाझर तलाव बांधण्यात आला होता . या पाझर तलावाची दुरुस्ती करण्याच्या कामाचा शुभारंभ आ.शशिकांत शिंदेच्या शुभहस्ते करण्यात आला . सदर भूमिपूजन प्रसंगी.सतिश चव्हाण , सुरेखा साळुखे उपसरपंच , ग्रा प सदस्य बशीर मुलाणी , विजया राजे , महेश पवार , सागर साळुखे , याकूब शेख , मारुती साळुखे , शिवाजी साळुखे , नंदकुमार चव्हाण , विजय साळुखे , संतोष साळुखे अशोक फणसे , अनिल पिसाळ , मच्छिंद्र घाडगे , मदन साळुखे , नाना साळुखे , प्रशांत साळुखे , युवराज गुरव , पिंटू नांगरे , अक्षय साळुखे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कामासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ५७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . सदरचे काम उत्कृष्ट दर्जाचे करून गळती पूर्ण काढण्यात येणार आहे . तसेच जैतापूर- देगाव -पाटेश्वर या रस्त्याचे भूमिपूजन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . या कामासाठी २२ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे . त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies