Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा पालिकेचा अंत्यसंस्कारातही घोटाळा? जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार,चौकशीची मागणी

 सातारा पालिकेचा अंत्यसंस्कारातही घोटाळा?

जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार,चौकशीची मागणी

प्रतीक मिसाळ- सातारा

सातारा- सातारा पालिकेकडून कैलास स्मशानभूमीत करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत . मृतांसाठी लागणारे जळण , वाहतूक यामध्ये दुप्पट खर्च दाखवून गेल्या वर्षभरात अंत्यसंस्कारात तब्बल ३० लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे , बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडेकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . निवेदनात म्हटले आहे की , करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांवर संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत मार्च २०२०  ,पासून अंत्यसंस्कार होत आहेत . या कामाची जबाबदारी सातारा पालिकेवर सोपविण्यात आली आहे . अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड पुरविण्याचे काम पालिकेने स्मशानभूमीजवळच असलेल्या राजेंद्र कदम या वखारमालकाला दिले आहे . संबंधित वखारमालक एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी १२ मण लाकूड व २०० रुपये वाहतूक खर्चाची पावती पालिकेला देत आहे . एक मण लाकडासाठी ३०० रुपये असे १२ मण लाकडासाठी ३६०० व एका मृतदेहामागे लाकूड वाहतूक खर्च २०० रुपये असे एकूण ३८०० रुपये खर्च एका अंत्यसंस्कारासाठी दाखविण्यात येत आहे . प्रत्यक्षात एकाच ट्रॅक्टर ट्रॉलीतून मृतांसाठी लागणारी लाकडे वजन न करताच अग्निकुंडापर्यंत आणून टाकली जात आहेत त्याचे कोणतेही मोजमाप होत नाही , अग्निकुंडापासून वखारीचे अंतर शंभर फूट इतकेच आहे . तरीही एका मृतदेहामागे २०० रुपये वाहतूक खर्च दाखविण्यात आला आहे . जो पूर्णपणे चुकीचा व शासनाची दिशाभूल करणारा आहे . अग्निकुंडांची क्षमता सात मण लाकूड बसेल इतकी आहे . त्यापेक्षा जास्त लाकूड अग्निकुंडात बसूच शकत नाही . शिवाय अंत्यसंस्कारासाठी वापरले जाणारे लाकूड रायवळ आहे . लाकडाचा बाजार भावाप्रमाणे दर २५० रुपये प्रति मण आहे . खर्चातील तफावत लक्षात घेतल्यास अंत्यसंस्कारासाठी वर्षभरात तब्बल ३० लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होते , नगरपालिकेचे अधिकारी , वखारमालक संगनमत करून ही फसवणूक राजरोसपणे करीत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आरोग्य मंत्र्यांना ई - मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies