Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मेढा येथे उभा राहणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट आ . शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार ; आमदार फंडातून केला निधी उपलब्ध

 मेढा येथे उभा राहणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट आ.शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार ; आमदार फंडातून केला निधी उपलब्ध

प्रतीक मिसाळ- सातारा



 सातारा- कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत . रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत . या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे . या प्लांटसाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे . कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही थैमान घातले आहे . दररोज दीड ते दोन हजारच्या पटीने रुग्णसंख्या वाढत आहे . रुग्णांना बेड मिळत नाही आणि बेड मिळाला तर ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत . या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेतला आहे . मेढा येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी लेखी पत्रव्यवहार करून चर्चा केली . या प्लांटसाठी निधीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यासाठी लागणारा संपूर्ण निधी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला आहे . त्यामुळे हा प्लांट उभा राहण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत . प्लांट निर्मितीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली असून या जागेची पाहणी सोमवारी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी केली . 



यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद्ध आठल्ये , उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव , प्रांताधिकारी सोपान टोणपे , तहसीलदार राजेंद्र पोळ , गट विकास अधिकारी सतीश बुद्धे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ .डी . आर . मोहिते , सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने , नगराध्यक्ष पांडुरंग जवळ , उपनगराध्यक्ष कल्पना जवळ , सर्व नगरसेवक , मुख्याधिकारी अमोल पवार , वैद्यकीय अधिक्षक डॉ . चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते . ऑक्सिजन प्लांट उभा राहिल्यानंतर जम्बो कोव्हीड केअर सेंटर , जिल्हा रुग्णालय , आरोग्य केंद्रांसह हॉस्पिटल्सना लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे आणि पर्यायाने कोरोना बाधित रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे . त्यामुळे या प्लांटची लवकरात लवकर उभारणी करून जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय तातडीने दूर करा , अशा सूचना आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies