Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अडरे आरोग्य केंद्राची सभापती रिया कांबळे यांनी केली पाहणी

अडरे आरोग्य केंद्राची सभापती रिया कांबळे यांनी केली पाहणी

रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या केल्या सुचना

ओंकार रेळेकर-चिपळूणअडरे पंचक्रोशीतून येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्व ग्रामस्थ मंडळींना आरोग्य केंद्राच्या वतीने चांगल्या सेवा सुविधा द्या कोरोना विषयी लोकांच्यात जनजागृती करा शासनाच्या सर्व आरोग्यदायी योजना सर्वत्र पोहचल्या पाहिजेत सभापती म्हणून जेथे जेथे माझी गरज लागेल तिथे मी आपल्या सोबत आहे,एखादी सोई सुविधा अपुरी असेल तर मला कळवा आमदार शेखर निकमसाहेब यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करेन अशा शब्दात सभापती रिया कांबळे यांनी मंगळवारी तालुक्यातील अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी  बोलतांना आश्वासन दिले. 

   चिपळूण पंचायत समितीच्या सभापती रिया राहुल कांबळे यांनी आज मंगळवारी तालुक्यातील अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली.अडरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होमक्वॉरंट असणाऱ्या रुग्णावर यशस्वीरित्या प्राथमिक उपचार केले जात असून शासनाच्या मार्गदर्शक परीपत्रकानुसार कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे,स्वच्छता, टापटीपपणा आणि मिळत असलेल्या आरोग्य सुविधे बाबत सांभापती रिया कांबळे यांनी येथील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच कोरोना काळात ग्रामस्थ मंडळींना चांगले मार्गदर्शन करा कोरोना विषयी जनजागृती करून लोकांच्या  मनातील भिती दूर करा आदरपूर्वक आरोग्य सुविधा द्या अशा सूचना सभापती कांबळे यांनी केल्या .अडरे आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य सेविका अस्मिता सावंत यांनी या बैठकीत आरोग्य सुविधांन विषयी माहिती दिली . आरटीपीसीआर आणि अँटीजन  चाचण्या येथे नियमित होत असून कोरोना संदर्भात लक्षणे आढळणाऱ्या लोकांना घरीच होमकोरोंटाईन राहण्याच्या सूचना केल्या जातात शिवाय आरोग्य सेवक दररोज अशा ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन त्यांना वेळच्या वेळी औषधे देतात शिवाय ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासली जाते, या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एकूण ८०२ कोरोना रुग्ण आढळले असून ५५० रुग्ण अन्य ठिकाणी उपचार घेऊन बरे झाले आहेत,सध्या येथे २११ रुग्ण (एक्टिव्ह)आहेत.मागील कोरोना संक्रमण सुरू झाल्या पासून पंचक्रोशीत एकूण ३७ रुग्णाचे निधन झाले आहे,तर मार्च २०२१ पासून ४ रूग्ण दगावले आहेत,यात कान्हे,वालोपे,कळंबते,खेर्डी येथील रुग्णाचा समावेश आहे,अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवा क्षेत्र असलेल्या पंचक्रोशीत १७ गावे असून एकूण ४८हजार लोकसंख्या येथे आहे, आरोग्य केंद्रा मार्फत एकूण ४० आरोग्य सेविका कार्यरत आहेत, विंचूदंश,सर्पदंश ईत्तर नेसर्गिक आजार या वर येथे उपचार केले जातात शिवाय येथे रक्त ,लघवी टेस्ट करीता लॅब ही आहे ,निलेश कदम येथे लॅब व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.वैद्यकीय अधिकारी यतीन मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडरे आरोग्य केंद्रात कोरोना संदर्भात प्राथमिक उपचार पद्धती आणि अन्य उपचार केले जातात आरोग्य सहायिका बरोबरच आशा सेविका ही काम करतात अशी माहिती आरोग्य सेविका अस्मिता सावंत यांनी दिली,प्राथमिक आरोग्य केंद्राच्याअंतर्गत अडरे,वेहेळे कान्हे, अनारी, चिंचघरी, सती, खेर्डी, वालोंपे, पेढे, परशुराम, कळंबते,दळवाटणे, धामणवणे, ही गावे येतात.डॉ.राधा मोरे,डॉ.भावे,डॉ.भागवत,आरोग्य सेविका अस्मिता सावंत,निलेश कदम,आरोग्य सेवक विनोद जाधव,सुपरवायझर राजेश जाधव,श्री.सावंत श्रीम.आढाव आरोग्य  सहाय्यिका इरकर आरोग्य सहाय्यक,  राजेश जाधव आरोग्य सहाय्यक, श्रीम. हरवंदे औषध आदी आरोग्य केंद्राच्या वतीने उपस्थित होते तसेच या वेळी सभापती रिया कांबळे,सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव,माजी सरपंच विजय सुर्वे,माजी सरपंच मानसी पवार,प्रमोद पवार,विनोद कांबळे,संदेश पवार,अशोक कांबळे,प्रदीप पवार,विनोद कांबळे आदी उपस्थित होते

आरोग्य केंद्राच्या वतीने सभापती कांबळे यांचे विनोद जाधव ,राजेश जाधव यांनी शाब्दिक स्वागत करून माहिती पुढील माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies