खंडेराजुरी तील कोरोना रुग्णासाठी भाजप कार्यकर्त्यांचा आरोग्यमंत्री राजेश टोपेना फोन
उमेश पाटील -सांगली
कोरोणा रुग्णासाठी भाजप कार्यकर्त्यांचा आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे ना फोन...... अन् तात्काळ मंत्री टोपेंचा रात्री नऊ वाजता मिरज सिव्हिल हाँस्पिटलला फोन .. चार हॉस्पिटल फिरून ही ऑक्सिजन कमी झालेल्या नारायणला .... नामदार टोपेंच्या रुपात देवदूत भेटला....मग सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास......
सध्या सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागात ही कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . सर्व हॉस्पिटल फुल्ल आहेत, बेड कोठेही मिळत नाही. कोरणा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की पेशंट परत येतो का नाही याची खात्री घरच्या नाही नसते.... पण खंडेराजुरी (तालुका मिरज) येथील गरीब कुटुंबातील नारायण धनसरे( वय 55)या रुग्णाला मात्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे हे देवदूत सारखे भेटले आणि माजी भाजपा तालुकाध्यक्ष दिनकर भोसले यांच्या ना. टोपे यांना ना केलेल्या एका फोनवरच त्यांना मिरज सिव्हिल मध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला.
खंडेराजुरी चे नारायण धनसरे कोरोणा पॉझिटिव होते ते घरातच उपचार घेत होते, एचआरटीसी स्कोर ही ज्यादा होता, पण त्यांची अक्सिजन लेवल 85 ते 86 च्या खाली येत होती. कोरोना म्हटलं की कुटुंबातील माणसे बाजूला जातात ...शेजारी दार लावतात ...गावकरी घराजवळ ही फिरकत नाहीत पण गावात कोरोना रुग्णांना आधार देणारे व त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करणारे माझी भाजपा पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य दिनकर भोसले, बाबू चौगुले यांनी तात्काळ त्यांच्या ऑक्सीजन सह सज्ज असणाऱ्या स्कार्पिओ गाडीत घेऊन मिरज गाठली........ पण गरीब असणारे कुटुंबांना, रुग्णांना कोणच वाली नसतो..... त्याप्रमाणे भारती हॉस्पिटल ,मिशन हॉस्पिटल आदी हॉस्पिटलच्या दारात अर्धा तास थांबून ही व्हेंटिलेटर ,बेड उपलब्ध नाही असे सांगितले....... त्यामुळे पेशंट कुठे ऍडमिट करायचा, पेशंटच बरं वाईट झालं तर काय करायचं असा प्रश्न दिनकर भोसले यांना पडला होता. पण म्हणतात ना नियत मात्र सदैव चांगलं काम करणाऱ्या च्या बाजूला मदत करते .
दिनकर भोसले व चौगुले या भाजपच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कल्पना सुचली. त्यांनी मोबाईल सर्च करून आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांचा नंबर मिळवला व त्यांना फोन करण्याचा निर्णय घेतला. रात्री नऊ वाजता राज्याचे आरोग्यमंत्री फोन उचलतील का? त्यांना इतकं काम असतं ते मदत करतील का? असे अनेक विचार असतानाच नंबर डायल केला........ आपली आई आजारी असताना सुद्धा राज्यात गतवर्षी व चालू वर्षी ही कोरोणा योद्धा म्हणून फिल्डवर अहोरात्र काम केलं .कोणत्या पक्षाचा ,कोणत्या जातीचा हे न पाहता महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे असं म्हणून सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे नामदार टोपे यांनी पहिल्या रिगंमध्येच फोन उचलला.
बीजेपीचे भोसले यानी रुग्ण नारायण यांची सर्व माहिती दिली ,आर्थिक परिस्थितीची कल्पना दिली. ना. टोपे यांनी तात्काळ जिल्हा कोरोना कंट्रोल रूम ला फोन केला.तिथून भोसलेना परत लगेच फोन आला.गाडी नंबर व रुग्णाचे नाव विचारात त्यांनी तात्काळ मिरज सिव्हिलला रुग्णाला घेऊन पोहचा असे सांगितले. रुग्ण नारायण ला घेऊन दिनकर काटे-भोसले हे तात्काळ मिरज सिव्हिला पोहोचले तितक्यात तिथले आरोग्य कर्मचारी बाहेर स्ट्रेचर घेऊन गाडी नंबर पाहताच नारायण ला स्ट्रेचरवर घेऊन तात्काळ ऍडमिट केले व व्हेंटिलेटर लावून त्यांच्यावर उपचार सुरू केले.
खरंच... आजही कोरोना च्या महामारीच्या काळात राज्याचे आरोग्य मंत्री एकाद्या गरीब रुग्णाला एका फोनवर सुद्धा जिवदान देवु शकतात..... ही गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेसाठी नक्कीच मान उंचावणार आहे. खंडेराजुरीच्या नारायणाला मात्र राज्याचे आरोग्य मंत्री देवदूता सारखे भेटले . रुग्णाला ऍडमिट केल्यानंतर पुन्हा नामदार टोपे यांना दिनकर भोसले यांनी फोन केला व आभार मानले ....तर नामदार टोपे यांनी शुक्रिया.. आमचं हे कामच आहे असे सांगितले........ खरंच नारायणाच्या मदतीला धावलेले दिनकर भोसले, बाबू चौगुले व ना.टोपे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. .....(कोरोनामुळे गावातील एका व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला .तर गावचे सरपंच गजानन रुकडे व ग्रा. पं. सदस्य दिनकर भोसले यांनी स्वतः खर्च देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले .