लसीकरण केंद्राला मंगेशभाई दांडेकर मित्र मंडळाचा मदतीचा हात. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 27, 2021

लसीकरण केंद्राला मंगेशभाई दांडेकर मित्र मंडळाचा मदतीचा हात.

 लसीकरण केंद्राला मंगेशभाई दांडेकर मित्र मंडळाचा मदतीचा हात.

अमूलकुमार जैन-मुरुड लेडी कुलसुम बेगम हॉस्पिटल मुरूड येथे कोरोना रोगावरील लसीकरणाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी लसीकरणाची पाहणी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते  मंगेश दांडेकर यांनी प्रत्यक्ष भेट देत तेथील नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना चांगली सेवा मिळावी आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नियोजनाची माहिती घेतली यावेळी लसीकरणासाठी नोंदणी करताना नेटवर्क चा व्यत्यय येत असल्याने लसीकरणासाठी नागरिकांना तासनतास ताटकळत उभे  राहावे लागत होते शिवाय लसीकरणासाठी स्टाफ ची कमतरता असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची हतबलता लक्षात घेऊन लवकर नोंदणी व्हावी यासाठी नागरपालिकेकडून व पंचायत समितीकडून कर्मचारी पुरवण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना विनंती केली आणि नेटवर्क व्यवस्थित मिळावे यासाठी मंगेशभाई मित्रमंडळाने स्वखर्चाने वायफाय बसवून दिली आहे. यामुळे लवकरात लवकर नोंदणी पूर्ण होऊन नागरिकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. शिवाय लसीकरणासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. येत्या 1 मे पासून यंत्रणेवरचा वाढणारा ताण यामुळे कमी होणार आहे.

 आरोग्य कर्मचार्यांसोबत योग्य ती चर्चा करून पुढील लसीकरणासाठी ताण पडू नये म्हणून प्रशासनाला शक्य ती मदत करण्याचं आश्वासन मंगेशभाई यांनी दिले यावेळी मनिष माळी,अमित कवळे, विजय पैर, विजय भोय, श्रेयस सरपाटील उपस्थित होते.No comments:

Post a Comment