Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या एकंबे गावाला आ.शशिकांत शिंदेंची भेट,उपाय योजनेचा घेतला आढावा

 कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या एकंबे गावाला आ.शशिकांत शिंदेंची भेट,उपाय योजनेचा घेतला आढावा

प्रतीक मिसाळ -कोरेगाव



 कोरेगाव तालुक्यातील एकंबे गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . त्याच पार्श्वभूमीवर आज एकंबे गावाला भेट देऊन ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी उपाययोजनावर आ.शिंदेंनी चर्चा केली . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकंबे गावात अचानक रुग्णांची संख्या वाढायला लागून गाव हॉटस्पॉट बनले आहे . त्यामुळे गावात कोरोना प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहेत . गावातील सिरीयस रुगांना बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी प्रयत्न केले . 



तसेच घरी विलगीकरन केलेल्या रुग्णांच्या तब्येतीची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे याची माहिती करून घेतली . गावात जास्तीत जास्त लोक घरात राहून या महामारीचा सामना करू शकतात त्यामुळे त्यावर ग्रामपंचायतीने नियम पाळण्यास लोकांना भाग पाडले पाहिजे . कोरोना काळात लागेल ती मदत करू असे आश्वासन यावेळी दिले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies