खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने चिपळूण शहरासाठी ७४ लाखचा विकास निधी मंजूर
ओंकार रेळेकर-चिपळूण
नगर परिषद मधील सर्व प्रभागात विकास कामांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी कोणतेही राजकारण न करता ७४ लाख रु. चा सरसकट विकास निधी मंजूर करून दिला.
याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. चिपळूण नगर परिषद मधील महाविकास आघाडी मधील नगरसेवकांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे विकास निधी मागितला होता. या मागणीची दखल घेत खासदार राऊत यांनी महाराष्ट्र शासन कडून सर्व १3 प्रभागासाठी ७४ लाख रु.चा निधी विकास कामांना मंजूर केला आहे. यासाठी खास करून विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुका समन्वयक देवळेकर, शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी विशेष मेहनत घेतली. खास बाब म्हणज बीजेपीचे नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागातही त्यांनी विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला. खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले