Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत व माथेरानला जमावबंदी मुक्त करून पर्यटनाला चालना द्यावी ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांची मागणी

 कर्जत व माथेरानला जमावबंदी मुक्त करून पर्यटनाला चालना द्यावी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष  सागर शेळके यांची मागणी

नरेश कोळंबे-कर्जत


 कर्जत तालुक्यात असलेल्या निसर्ग समृध्दिने अवघ्या जगाचे लक्ष कर्जत माथेरान कडे लागलेले असते . पावसाळ्यात चालू होणारे धबधबे व प्राचीन लेण्यांमुळे कर्जत चे सौंदर्य पाहण्यासाठी बाहेरून लोक येत असतात. परंतु मागील ४ वर्षांपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे .आणि यामुळे सर्व परिसराचे उत्पन्न घटले असून छोट्या मोठ्या दुकानदारांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे कर्जत मध्ये सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने जमावबंदी आदेश उठवून पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी केली आहे.


           कर्जत तालुक्यात औद्योगिकरण नसल्याने रोजगाराची खुप मोठी समस्या आहे, पण  कर्जत तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे. त्या सौंदर्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण व कर्जत मधील लेण्या आणि धबधबे प्रशासनाने १४४ कलम लावून ४ वर्षांपासून बंद केले आहेत. ,मागील वर्ष व चालू वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाचा योग्य निर्णय योग्य होता,पण त्या अगोदरचे 2 वर्ष ही नियम लावण्यात आला होता. पावसाळ्यात पर्यटक ट्रेकिग व फिरायला मोठ्या प्रमाणात कर्जतमधे येतात. तालुक्यात आशाणे धबधबा, बेकरे, वदप, नेरळ जुमापट्टी, सोलनपाड़ा, कोंढाणा लेणी, माथेरान असे अनेक धबधबे व लेणी पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळावर अनेक छोटे मोठे दुकानदार, होटेल व्यावसायिक ,ग्रामीण भागात घरगुती जेवण देणारे लोक, खानावळ, वडापाव, भजी विक्रेते, हातगाड़ी वर मक्का विकणारे, चहा, कॉफ़ी विकणारे, सैंडविच वाले,पानटपरी असे अनेक छोटे मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. रिक्षा वाले, माथेरानचे टैक्सी वाले, घोड़ेवाले, हॉटेल व्यावसायिकांना दूध,भाजी, किराणा पोहचवणारे, ट्रांसपोर्ट वाले यांसारखे असंख्य व्यावसायिक एकमेकावर अवलंबून आहेत. त्यात लॉकडाउन कोरोनामुळे अनेक लोकांचा व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आलाय, नोकर वर्गाचा पगार देता येत नाही, बँकेचे लोनचे हप्ते, रिक्षा ,टैक्सी,टेम्पो,याचे बँकेचे थकित राहिलेले हप्ते,कुटुंब,घर चालवायचे कसे ? असे अनेक प्रश्न या व्यावसायिक यांना पडला आहे . 

 लोकांच्या जीवाला धोका आहे हे सांगून १४४ कलम इतर गोष्टींचा विचार न करता लावणे म्हणजेच या सर्व स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक संकटात टाकणे , व स्वतःची जबाबदारी झटकून मोकळे होणे असे झाले आहे  . यावर योग्य निर्णय घेण्यात येऊन ह्या सर्व व्यावसायिकांना जीवदान देण्यात यावे.


गोव्याच्या दूधसागर धबधब्याच्याच  धर्तीवर पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटन वाढीसाठी स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकाकडून योग्य कर घेऊन, त्यातून त्यांच्या  सुरक्षिततेसाठी लाइफ गार्ड नेमावेत. कचरा व्यवस्थापन करावे, चेंजिंग रूम, टॉयलेट या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यातून स्थानिक युवकांना रोजगार निर्माण होईल. पर्यटकांना नियम व अटी लागु करावेत.या मूळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल,व स्थानिक लोकाना निदान पोटा पुरता का होईना रोजगार निर्माण होईल.माथेरान पूर्ण पने पर्यटनावर अवलंबून आहे आणि माथेरान मधे येणाऱ्या पर्यटकांवर तालुक्यातील कर्जत चारफाटा असेल,डिकसल,नेरल मधील वडापाव स्टॉलधारक,होटेल व्यावसायिक ,टैक्सीधारक अवलंबून आहेत,तरी माथेरान व कर्जत करांचा योग्य विचार व्हावा.

 सागर शेळके
अध्यक्ष,कर्जत तालुका,राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies