Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या लढ्याला मोठे यश पोलीस भरतीचे लवकरच आदेश निघणार गृहमंत्र्यांचे संघटनेला आश्वासन सैफ सुर्वे

 महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या लढ्याला मोठे यश पोलीस भरतीचे लवकरच आदेश निघणार गृहमंत्र्यांचे संघटनेला आश्वासन   सैफ सुर्वे

राज्यात हजारो तरुणांचे पोलीस होण्याचे स्वप्न होणार साकार

             ओंकार रेळेकर-चिपळूण

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर पुकारलेले आंदोलन आणि  वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे  यश  आले आहे.या मागणी नुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी  राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची प्रत्यक्ष नुकतीच भेट घेतली या भेटीत ना.वळसे-पाटील यांनी आपण लवकरच  पोलीस भरती जाहीर करू असे आश्वासन दिले आहे

अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.   

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबीयांकरिता त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करते पोलिसांवरील हल्ले,निवृत्तीनंतर पोलिसांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत व्हावा,पोलिसांना हक्काची घरे मिळावीत या आणि अशाप्रकारच्या अनेक मागण्याकरिता संघटनेने राज्यभर अनेक आंदोलने केली आहेत यातून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायही मिळाला आहे. जिल्हाध्यक्ष रौफ सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातही पोलिसांकरिता कामे सुरू आहेत.कोकणात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग शिक्षण घेऊनही बेरोजगार आहे अशा वेळी या तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून आमची संघटना

कामाला लागली आहे पोलीस खात्यात ताबडतोब भरती व्हावी या मागणी करीता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभर निदर्शने केली १ मे रोजी मंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करीत आम्ही या बाबत साकडे घालणार होतो या वेळी आंदोलन केले तर गुन्हा दाखल करू असे शासनाने राज्य अध्यक्ष राहुल दूबाले यांना कळवुन नजरकैदेत ठेवले होते.तरीही संघटनेने आपले आंदोलन सनदशिर मार्गाने सुरूच ठेवत राज्यातील सर्व लोकप्रतिनिधीना पत्रव्यवहार करून पोलीस भरतीचे महत्व पटवून देत शासनाला भरती प्रक्रिया करण्यासाठी विशेष आग्रह केला अखेर मंगळवार दि .८ जून रोजी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या शिवगिरी निवस्थानी संघटनेचे अध्यक्ष राहुल दूबाले आणि प्रमुख पदाधिकारी यांची ना.वळसे-पाटील यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर दूबाले यांच्या पाठपुराव्याची दखल घेत ना.वळसे-पाटील यांनी पोलीस खात्याला नव्या भरती संदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत आणि लवकरच पोलीस भरती जाहिर करू असे आश्वासन दिले  

यावेळी पोलीस भरती तात्काळ करण्यात यावी, डी.जी लोन, पोलीस अधिकारी यांच्या मुलांना अनुकंपावर नियुक्ती देण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी,

पोलीस महामंडळ स्थापन करण्यात यावे,पोलीसांच्या पाल्यांना त्यांचे पालक सेवेत असताना आरक्षणाचा लाभ मिळावा,पोलिसांवर हल्ला करणार्यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, पोलिसांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात यावी या मागण्याचे निवेदन 

देण्यात आले अशी माहिती रौफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.युवकांनो तयारीला लागा पोलीस बॉईज संघटना आपल्या मागे सदैव आहे असे सांगून भविष्यात भरती प्रक्रियेत संघटना युवकांना मार्गदर्शन आणि संपूर्ण सहकार्य करेल असे सैफ सुर्वे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies