सांगलीत कसबे डिग्रज बंधारा पाण्याखाली
सुधीर पाटील सांगली
सतत चालु असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज यांना जोडणारा बंधारा गुरुवारी सायंकाळी पाण्याखाली गेला आहे. बुधवार पासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने नदीपात्राच्या पाणीपातळी झपाट्याने वाढत होत चालली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याचे समजताच पाणी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.