पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज.
सुधीर पाटील-सांगली
जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीचा व नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती बाबत त्वरीत माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण कार्यालय सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी 24 x 7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक ही देण्यात आला आहे. तसेच 0233-2600500 हा क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्र.. 0233-2672100 हा आहे.
पूरबाधित गावांची संख्या 104
जिल्ह्यात 104 गावे पुरबाधित क्षेत्रात येतात. कर्नाटकातील आलमट्टी धरण नियंत्रण प्रशासन यांच्याबरोबर समन्वय ठेवण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.