टोकीयो ऑलिंम्पिक 2020 स्पर्धेत निवड झालेल्या प्रविण जाधव यांच्या पालकांचे जिल्हाधिकारी यांनी केले अभिनंदन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 15, 2021

टोकीयो ऑलिंम्पिक 2020 स्पर्धेत निवड झालेल्या प्रविण जाधव यांच्या पालकांचे जिल्हाधिकारी यांनी केले अभिनंदन

  टोकीयो ऑलिंम्पिक 2020 स्पर्धेत निवड झालेल्या प्रविण जाधव  यांच्या पालकांचे जिल्हाधिकारी यांनी केले अभिनंदन 

प्रतीक मिसाळ- सातारा

टोकीयो ऑलिंम्पिक 2020 करिता धनुर्विद्या खेळाच्या भारतीय संघामध्ये सातारा जिल्ह्यातील मौजे सरडे , ता . फलटण येथील प्रविण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या आई - वडिलांचे अभिनंदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपल्या अथक परिश्रमामुळे व प्रोत्साहनामुळेच प्रविण जाधव यांनी उच्चतम कामगिरी करुन जिल्ह्याचा गौरव संपूर्ण भारत देशामध्ये वाढविला असून त्यांच्या अडीअडचणीबाबत चर्चा केली व संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली . टोकीयो ऑलिंम्पिक 2020 करिता निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईटचे उद्घाटन प्रविण जाधव यांचे पालक व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक , अध्यक्ष सातारा जिल्हा आर्चरी असो.आबासाहेब जाधव , सचिव सातारा जिल्हा आर्चरी असो . चंद्रकांत भिसे , शिक्षक विकास भुजबळ , मोहन पवार व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment