प्रतिपंढरपूर करहर येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक संपन्न .
प्रतीक मिसाळ -जावली-सातारा
सातारा जिल्ह्यातील समस्त वारकरी बांधवांचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या करहर तालुका जावली येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या आषाढी वारीच्या नियोजनासाठी आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक जिल्हापरिषद सदस्य वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या वतीने बोलवण्यात आलेल्या या आढावा बैठकीस जावलीचे प्रांत टोपे , वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . शितल जानवे , तहसिलदार श्री राजेंद्र पोळ यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले . सध्या कोरोनाच्या महामारीत जावली तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात असल्यामुळे कोणतेही धार्मिक कार्यक्रम , सोहळे करण्यास राज्य शासनाची परवानगी नाही . तरी प्रतिवर्षीच्या आषाढी वारीत खंड म्हणून कोरोनाचे नियम पाळून फक्त प्रत्येकी पाच वारकऱ्यांची कोरोना आर.टी.पी.सी.आर टेस्ट करूनच गेल्या वर्षी प्रमाणे काटवली बेलोशी ते थेट करहर पालखी वहानातूनच घेऊन यायचा निर्णय घेण्यात आला . वारकरी सांप्रदायाच्या वतिने काटवलीचे माजी सरपंच हणमंत बेलोशे , दापवडीचे पोपटराव रांजणे , पानसचे बापूराव गोळे या प्रतिनिधींनी वारकऱ्यांची तळमळ मांडली . भाजपाचे जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मिळत असलेल्या वागणूकीवर नाराजी व्यक्त करत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आषाढी वारीस परवानगी मिळण्याची मागणी केली . तर जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कोरोनाच्या काळात विभागातील अनेक नामवंत वारकरी व लोकांचे निधन झाल्यामुळे या वर्षी पांडूरंगाला विनंती करून घरूनच दर्शन घेऊया आणि आपापल्या लोकांचे जीव महत्वपूर्ण आहेत ते वाचवूया असे मत मांडून विभागातील जनतेच्या व वारकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला सहकार्य करण्याचे अश्वासन दिले .
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही वारकरी बांधवांची भावना बोलून दाखवली आणि हभप . बंडातात्या कराडकर , विलास बाबा जवळ यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली त्याची खंत व्यक्त केली आणि पोलिस प्रशासनाने एखाद्या आरोपीसारखी वागणूक देणे चुकीचे असून , प्रशासनाने घाई घाईने निर्णय न घेता , थोडे थांबून विचारविनिमय करून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सुचित केले . वारी हा वारकऱ्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस असून , पंढरपूरला ज्या भाविकांना जाता येत नाही त्यांच्यासाठी हभप वैकुंठवासी दत्तात्रय महाराज कळंबे यांनी करहर येथे प्रतिपंढरपूर तयार केले त्यांच्या भक्तीचा वारसा टिकून रहाण्यासाठी व येथील मंदिर परिसर आणि विभागाच्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगीतले . परंतु दोन दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन सगळ्यांनी करावे असे आवाहन केले.प्रशासनाने परवानगी दिलेल्या मोजक्याच वारकऱ्यांना व मानकरी ग्रामस्थांनी स्वतःसह इतरांचीही काळजी घेऊन आषाढी वारीचा आनंद शक्यतो घरूनच घ्यावा अशी वारकरी बांधवांना विनंती केली . करहरचे सरपंच यादव , पोलिस पाटील , अनिल विभूते , जावली कृषीउत्पन्न बाजार समीतीचे सदस्य राजेंद्र गोळे , सयाजीराव शिंदे , पिंपळीचे माजी सरपंच प्रमोद शिंदे , खादी ग्रामोद्योगचे चेअरमन अशोक गोळे , गोरख महाडीक , रविंद्र गावडे , संजय शिंदे , प्रतापगड कारखान्याचे संचालक रामदास पार्टे , गोपाळराव बेलोशे , रांजणीचे माजी सरपंच संतोष रांजणे , पत्रकार रविंद्र बेलोशे , रवि गावडे , पाडळे तसेच विभागातील विविध गावचे सरपंच , पोलिस पाटील बैठकीनिमीत्त उपस्थितीत होते . जावलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री अमोल माने , आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान मोहिते , डॉ . वेलकर , विद्युत मंडळाचे राठोड , मंडल अधिकारी विजय पाटणकर , तलाठी सागर माळेकर विविध गावचे ग्रामसेवक त्याचप्रमाणे विभागातील विविध गावचे वारकरी व दिंडीचे चालक , प्रतिनीधी , करहर तसेच विविध गावचे सरपंच , सर्वपक्षीय प्रतिनिधी यांचे उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली . नितीन गावडे सर यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.