मुरुड तालुक्यातील काशिद पुलाचे काम युध्दपातळी सुरू
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याला पाऊसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातच १०-११जुलै रोजी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात तर ढगफुटी सदृशस्थिती निर्माण झाली होती. मुरुड तालुक्यात ह्या आधी कधी न होणारी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यातच तालुक्यातील काशिद गावाजवळील ५०वर्ष जुना असलेला पूल पाण्याच्या जोरदार प्रवाह मुळे वाहून गेला होता. त्यामुळे अलिबाग मुरुड तालुक्याना जोडणारा मार्गच पूर्णतः बंद झाला आहे.परिणामी प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली असून काशिद येथील पुलाचे काम युध्द पातळी सुरू केले आहे. लवकरात लवकर येथील पुलाचे काम पूर्ण होणार असून अलिबाग मुरुड मार्ग पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसत आहेत.