Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान..

संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान..

              सतीश पवार -इंदापूर

इंदापूर तालुक्यातील गुलाबनगर ( रेडा ) येथून संत गुलाबबाबा पालखीची विधिवत पूजा करून हा पालखी सोहळा गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाला . कोरानामुळे हा सोहळा गेली दोन वर्ष साधेपणाने होत आहे . कोरोनाचे नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने श्री संत गुलाबबाबा पालखी प्रस्थान झाले . टाळ - मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकाराम , गोपाला गोपाला च्या नाम घोषाने वातावरण भक्तीमय झाले होते . यावेळी पालखी सोहळ्याचे मानाचे अश्व सराफवाडी येथील भागवत धायगुडे , चोपदार , विणेकरी , तुळशी वृंदावनचे मानकरी उपस्थित होते . यावेळी येथील संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अॅड . तानाजीराव देवकर म्हणाले की , संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे सोळावे वर्षे असून कोरोनाच्या पादुर्भावामुळे हा पालखी सोहळा अगदी साध्या पद्धतीने सालाबादप्रमाणे प्रस्थान करत असून संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पालखी सोहळा पाच दिवस मुक्काम करणार आहे . रोजच्या रोज प्रवचन , भजन मोजक्या वारकरी मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून दररोज पूजा होणार आहे . आषाढी एकादशी दिवशी संत गुलाबबाबा यांच्या पादुका नीरा नरसिंहपूर संगमावरती चंद्रभागेचा जिथून उगम झाला , तिथे स्नान करून परत मंदिरामध्ये आणल्या जातील आणि गोपाळकाल्याचे किर्तन मोजक्याच वारकरी मंडळी झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होईल असे ऍड.तानाजीराव देवकर यांनी सांगितले .

यावेळी रेडा गावचे सरपंच सौ.सुनिता देवकर , नानासाहेब देवकर , मच्छिंद्र पवार , धनंजय गायकवाड , संत गुलाबबाबा संस्थानचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले की , पालखी सोहळ्याचे वेळी परिसर भक्तिमय झालेला असतो . प्रत्येक जण आपापल्या घरी वारकरी भोजनासाठी घेऊन जात असतो.आपापल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करत असतो.पण कोरोनामुळे हा आनंद गेली दोन वर्षे घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली . संत गुलाबबाबा कर्मभूमी काटेल धाम व जन्मभूमी टाकरखेड मोरे येथून काटेल धाम संस्थान अध्यक्ष सोनूमामा भाटिया , सचिव डॉ . पुरुषोत्तम दातकर सर्व विश्वस्त मंडळ , आणि टाकरखेड येथील संत गुलाबबाबाचे वंशज ज्ञानेश्वरभाऊ उमक , गोपाल उमक सर्व विश्वस्त मंडळ , पुणे , सोलापुर , नंदुबार , नागपुर , सागर ( म.प्र ) , रायपुर , औरगांबाद , मुंबई , अलिबाग येथील भक्तांनी दूरध्वनीवरून पालखीसोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

संत गुलाबबाबांचे भक्त हे महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक राज्यातून आणि जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातील संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यास भक्त मंडळी येत असतात . उद्योजक , व्यावसायिक , व्यापारी यांचीही मोठी उपस्थित असते . या कार्यक्रमासाठी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक , संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अॅड.तानाजीराव बाबुराव देवकर , सरपंच सौ . सुनीता देवकर , सचिव तुकाराम जगदाळे , माजी सरपंच तुकाराम देवकर , नानासाहेब देवकर , ॲड.योगेश देवकर , संतोष देवकर , शेटफळ हवेलीचे संत गुलाबबाबा भक्त मंडळ , रत्नदिप शिंदे , उमेश पाटील , दिलीप देवकर , आदिनाथ देवकर , बापु शिंदे , किसन देवकर , ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गणपत जाधव , जनार्दन गोसावी , ज्ञानदेव पवार , काशिनाथ देवकर , रेडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश खारमाटे , कर्मचारी गणेश वाघ , महिला मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies