Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार: नितीन बानूगडे पाटील शिवसेना उपनेते

 सातारा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार: नितीन बानूगडे पाटील शिवसेना उपनेते 

निवडणुकीच्या तयारीला लागा कार्यकर्त्यांना दिले आदेश 

प्रतीक मिसाळ-सातारा


येवू घातलेल्या सातारा नगरपालिका निवडणुकी संदर्भात सातारा शहर शिवसेना सर्व आजी माजी पदाधिकारी यांची महत्व पूर्ण बैठक दैवज्ञ भवन मंगल कार्यालय सातारा येथे पार पडली या प्रसंगी बोलताना मा.ना.नितीन बानुगडे पाटील म्हणाले येणारी नगरपालिका निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे . त्या दृष्टीकोनातून पक्षप्रमुख मा.ना. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क नेते मा.ना. दिवाकर जी रावते साहेब व नगरविकास मंत्री मा . एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आजची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.पक्ष सर्व ताकतीसह कार्य कर्त्यांच्या मागे उभा राहणार असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या पदाधिकारी यांच्या कडे सांगाव्यात नक्कीच त्या सर्व सोडविल्या जातील . तसेच त्यांनी प्रत्येक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी नगर पालिकेतील शेवटच्या मतदारापर्यंत संपर्का करून शिवसेना सरकारची व मुख्यमंत्री यांची विकास कामे पोहचविण्याचे आवाहन केले या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक सचिन मोहिते उपजिल्हाप्रमुख शिवसेना सातारा विधानसभा यांनी प्रास्ताविक पार बोलताना संघटनेचे महत्व स्पष्ट करून हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सांगितली जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी सर्व कार्य करते यांच्या वतीने लवकरच वॉर्ड निहाय बैठका घेऊन फुडिल रणनीती ठरविणार असे सांगितले . प्रसंगी तालुका प्रमुख अनिल गुजर , आतीस ननावरे , शहरप्रमुख निलेश मोरे , महिला शहर संघातीका रूपा लेंबे , युवा सेना अधिकारी महेश शिर्के , शिवाजी पवार , प्रणव सावंत , मारुती वाघमारे , सयाजी शिंदे , मंजिरी सावंत , रमेश बोराटे , प्रशांत शेळके , मोहन इंगळे संतोष शिंदे , निलेश चित्रागार सागर रायते इम्रान बागवान , अक्षय जमदाडे , सपकाळ दादा , सर्व उप शहरप्रमुख , विभागप्रमुख , व आजी माजी पदाधिकारी , शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies