Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पूरग्रस्तांना शक्य तेवढी मदत करा : आ . शशिकांत शिंदे

 पूरग्रस्तांना शक्य तेवढी मदत करा : आ . शशिकांत शिंदे

प्रतीक मिसाळ-सातारा 

 गेल्या तीन दिवसापासून सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे . पावसाने अनेकांचे बळी घेतले असून काही जण अद्याप बेपत्ता आहेत . या भीषण संकटामुळे अनेकांचे संसार उघडे पडले असल्यामुळे पाऊस आणि स्तांना मदत करण्याचे आवाहन शनिवारी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आ . शशिकांत शिंदे , जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे . पत्रकात म्हटले आहे , सातारा जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून फार मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील काही तालुक्यांना बसला आहे . अनेक ठिकाणी दरडी कोसळून घरांचे नुकसान होऊन जीवित हानी झाली आहे . अशा भीषण संकटात पाऊस व पूरग्रस्तांना मदत करण्याची आपली संस्कृती असून यापूर्वीही जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा तेव्हा मदतीचा हात देण्यात आला आहे . ज्या पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मदत केली जाणार असून ही मदत पंचनामे झालेल्या पात्र पूरग्रस्तांना त्यांच्या नुकसानीचा पंचनामा पाहून केली जाईल . तात्पुरता निवारा व मोठ्या कामांसाठी लागणारी आर्थिक मदत अशा स्वरूपाची ही मदत आहे . 

जिल्ह्यातील कार्यकर्ते , नागरिक व सामाजिक संस्था यांनी आपली मदत धनादेश स्वरूपात अथवा पक्षाच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , शाखा कॅम्प सातारा येथील खाते क्रमांक ०००१२४२०२६०००१२ ९ यावर रोख स्वरूपात जमा करावयाची आहे . धनादेश सातारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी या नावाने द्यावा . जिल्ह्यातील नागरिक व कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मदत जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies