कुणाच्याही जाण्याने मनसेचा तटबंदी बुरुज जराही ढासळणार नाही - वैभव खेडेकर - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, July 18, 2021

कुणाच्याही जाण्याने मनसेचा तटबंदी बुरुज जराही ढासळणार नाही - वैभव खेडेकर

कुणाच्याही जाण्याने मनसेचा तटबंदी बुरुज जराही ढासळणार नाही - वैभव खेडेकर

मनविसे राज्य अध्यक्षपद अमित ठाकरेंच्या हाती देण्याची एकमुखी मागणी

ओंकार रेळेकर-चिपळूण


महाराष्ट्र नवनिर्माण सेने मधून कुणीही जाण्याने मनसेचा तटबंदी बुरुज जराही ढासळणार नाही उलट महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक अधिक त्वेषाने पेटून उठेल , यापुढे जो कोणी अशी हिंमत करेल त्याला मनसैनिक आपल्या स्टाईलने त्याची जागा दाखवून देईल असा जोरदार ईशारा मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी दिला.

१८ जुलै रोजी चिपळूण येथे अतिथी हॉटेल सभागृहात झालेल्या मनसे विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा बैठक प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या हाती मनविसेची महाराष्ट्रची जबाबदारी देण्याची जोरदार मागणी केली.यावेळी वैभव खेडेकर यांनी संघटनेची शिस्त न पाळणाऱ्या व गटबाजी करणाऱ्यावर कारवाई करा अशी कडक सूचना पण केली.यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे,मनविसे राज्य उपाध्यक्ष शैलेश धारिया, संपर्कप्रमुख अमोल साळुंखे, मनविसे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे,गुरुप्रसाद चव्हाण,कामगार संघटना जिल्हा सरचिटणीस संदीप फडकले,रोजगार जिल्हा संघटक रुपेश जाधव,चिपळूण शहराध्यक्ष गणेश भोंदे,चिपळूूूण उपतालुुकाध्यक्ष अभिनव भुरण, खेड शहराध्यक्ष प्रसाद शेट्ये,राजू आंब्रे,मनसेचे बोरगाव सरपंच सुनील हळदणकर, महिला आघाडीच्या श्रावणी चिपळूणकर ,उपशहराध्यक्ष सौ वृषाली सावंत,युवती तालुकाध्यक्ष अस्मिता पेंढाबकर आदी उपस्थित होते.

संघटनेचे प्रामाणिक काम करणाऱ्यांचा भविष्य काळ उज्वल आहे.राज साहेबांनी ज्यांना मोठे केले त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले त्यांची आज काय अवस्था झाली हे उभा महाराष्ट्र पाहत आहे.

               यावेळी त्यांनी महामार्गावरील खड्डयांबाबत सरकार व प्रशासनावर टीका केली.

No comments:

Post a Comment