Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्लीत घेतली नव्या मंत्र्यांची भेट !

 माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्लीत घेतली नव्या मंत्र्यांची भेट ! 

                     सतीश पवार- इंदापूर

माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील नुतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले . या भेटीत नुतन केंद्रीय मंत्र्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली . नवी दिल्ली येथे बुधवार व गुरुवारी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सूक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे , भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व रेल्वे , कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे , केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड , केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार या नुतन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या . 

व यावेळी या सर्व नेत्यांची हर्षवर्धन पाटील यांची विविध विषयावरची चर्चा झाली.या चर्चेत राज्यातील विकास कामांसाठी भाजप पक्षवाढीसाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.दरम्यान , केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत पालखी मार्गांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचबरोबर विविध रस्ते , पूल , भुयारी मार्ग यांच्या कामासाठी मागणी केल्यानंतर तात्काळ निधी उपलब्ध करून दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies