मिरजेत परिचारिकेची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या
खाजगी रुग्णालयात होती परिचारिका, सुसाईड नोटही सापडली
उमेश पाटील -सांगली
शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका युवतीने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आम्रपाली सतीश कांबळे (वय 20, रा. मराठे मील चाळ जवळ, रमामाता आंबेडकर कॉलनी, मिरज) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, पोलिसांना सदर चिठ्ठी सापडली आहे.
आम्रपाली कांबळे ही एका खाजगी रुग्णालयात परिचारका होती. तिने राहते घरी विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले. याची घरच्यांना माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून आत्महत्ये पूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यातून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याबाबत मिरज गांधी चौक पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरातून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.