Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा जिल्ह्यातील शासकीय पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जाणार संपावर

 सातारा जिल्ह्यातील शासकीय पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जाणार संपावर 

प्रतीक मिसाळ सातारा

आपल्या विविध मागण्यांसाठी आज सोमवारपासून राज्यातील चार हजार शासकीय पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी बेमुदत संपावर गेले असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे . दरम्यान , पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आज पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवले आहे . निवेदनात म्हटले आहे , भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १ ९ ८४ कलम ३० ( ब ) अंतर्गत राज्य सुधारणा विधेयकाद्वारे व्यवसायिक नोंदणी देऊन सं - रक्षण देण्यात यावे , पशुधन विकास अधिकारी गट - अ सेवा प्रवेश नियमनात पदविका प्रमाणपत्र धारक पशुवैद्यकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांना गट असंवर्गात कोटा कायम ठेवावा . पविअ गट- अ पंचायत समिती या परिणामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट- अ पंचायत समिती करू नये , पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक , पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्त सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार वेतनस्तर एस २२ सुधारित वेतन निश्चिती आदेश द्यावेत . ग्रामसेवक कृषी सहायकांच्या धर्तीवर स्वर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा , पदविका व प्रमाणपत्र धारकांची अहर्ता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १ ९ ८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करण्यात यावे . शासन अधिसूचना दि . २७ ऑगस्ट २०० ९ रद्द करून सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात यावी , पशुसंवर्धन विभागातील अधिकारी , कर्मचारी यांना विमासुरक्षा कवच व आवश्यक सेवेतील सुविधा द्याव्यात , पशुधन विकास अधिकारी गट- ब पदोन्नती संदर्भातील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर येथील प्रलंबित याचिकेत संदर्भात पाठपुरावा करावा , राज्य स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची रिक्तपदे भरावीत , बाह्यऐवजी नियमित सेवा भरती करावी , राज्यात बारावीनंतर तीन वर्षाच्या पशुसंवर्धन विषयास पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा , पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदोन्नती देण्यात यावी , आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत .यावेळी डॉ . प्रमोद घोरपडे , कांबळे , भिसे , लेडाळ , नितीन चव्हाण , बलदेव निकम , वैशाली केंद्रे , भोईटे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies