Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत व नेरळ रेल्वे स्थानकांना हुतात्म्यांची नावे देण्याची मागणी

 कर्जत व नेरळ रेल्वे स्थानकांना हुतात्म्यांची नावे देण्याची मागणी 

भगत मास्तर प्रतिष्ठान व एक दीप शहीदांचा ग्रुप यांनी दिले आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन 

नरेश कोळंबे -कर्जत

    

कर्जत तालुक्यातील हुतात्मे यांनी कर्जत तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील देशाच्या लढ्याला कर्जत मधून हातभार लावला असल्याने या हुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोत वाल यांची नावे नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकांना देण्याची मागणी करणारे निवेदन आमदार महेंद्र थोरवे यांना शहीद भगत मास्तर प्रतिष्ठान व एक दीप शहिदांचा ग्रुप ह्यांच्या माध्यमातून देण्यात आले .

  कर्जत तालुक्यात स्वातंत्र्य पूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील व गोमाजी पाटील यांनी आपले रक्त वाहिले आहे. या स्वातंत्र्याच्या लढ्यात २ जानेवारी १९४३ मध्ये धारातीर्थी पडलेल्या या वीरांना कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी व ह्या वीरांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहीद भगत मास्तर प्रतिष्ठान आणि एक दीप शहीदांचा ग्रुप यांनी एकत्र येत कर्जत पोसरी येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी जाऊन कर्जत व नेरळ या  स्थानकांना हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांची नावे देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भरत भगत , मिलिंद विरले यांच्या सोबत शहीद भगत मास्तर प्रतिष्ठान आणि एक दीप शहिदांचा ग्रुप चे सदस्य होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies